​'बॉईज' मध्ये दिसणार सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:25 IST2017-08-17T06:55:58+5:302017-08-17T12:25:58+5:30

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणारा 'बॉईज' हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि ...

Sunny Leone's Maratha Style Looks In 'Boyz' | ​'बॉईज' मध्ये दिसणार सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज

​'बॉईज' मध्ये दिसणार सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज

शोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणारा 'बॉईज' हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित येत्या ८ सप्टेंबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात चक्क सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या या सिनेमाच्या साँग लाँच सोहळयाला तिने विशेष उपस्थिती लावली. शिवाय सुरेश वाडकर आणि सचिन पिळगावकर या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते 'बॉईज' सिनेमाच्या म्युझिक आणि ट्रेलरचे दिमाखात अनावरण करण्यात आले. 
या सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्यात सनी लिओनी आकर्षणाचा विषय ठरली. विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज' या सिनेमातील सनीवर आधारित 'कुठे कुठे जायचे हनिमूनला' या मराठमोळ्या लावणीचे सादरीकरण तिच्या हस्ते करण्यात आले. 'मराठी संस्कृतीचा पेहराव या गाण्याच्या निमित्ताने मला परिधान करायला मिळाला, मी पहिल्यांदाच नऊवारी साडी घातली होती. हे गाणे माझ्यासाठी खूप खास असून हे गाणे सुपरहिट होईल अशी मी आशा करते,' अशी भावना सनीने यावेळी व्यक्त केली. 
याच कार्यक्रमात सचिन पिळगावकर आणि सुरेश वाडकर यांच्या हस्ते 'बॉईज' सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच करण्यात आला. तीन मित्रांची दुनिया या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड हे कलाकार दिसून असून पार्थ आणि प्रतिकच्या खोड्या आणि सुमंतचा शांत, सुशील स्वभाव आपल्याला पाहायला मिळतोय. खेळात तसेच अभ्यासात अव्वल असणारा सुमंत, या दोन खट्याळ मित्रांच्या सान्निध्यात येऊन कसा बदलतो, हे या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. तसेच घरापासून दूर बॉर्डिंगमध्ये राहत असलेल्या मुलांची रंगीत दुनियादेखील ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. यात अभिनेता संतोष जुवेकर एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसून येतोय. या सिनेमाचा ट्रेलर 'बॉईज' या नावाला साजेसा असून किशोरवयीन मुलांची दुनिया यात मांडण्यात आली आहे. मैत्री, प्रेम, शाळा आणि अभ्यास या चार भिंतीतील त्यांची दुनिया 'बॉईज'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 
या सिनेमातील गाण्यातही 'बॉईज'गिरी ठासून भरलेली आपल्याला दिसून येतेय. या गाण्यातील लावणीच्या सिक्वेलमध्ये सनीचा मराठमोळा लूक आपल्याला पाहायला मिळतोय. हे गाणे सुनिधी चौहानने गायले आहे. शिवाय 'बॉईज' सिनेमातील 'जीवना' तसेच 'लग्नाळू' आणि 'यारीया' या गाण्याचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले. स्वप्निल बांदोडकरच्या आवाजातील 'जीवना' या गाण्याला रसिकांचा उंदड प्रतिसाद मिळत असून वयात येणाऱ्या मुलांच्या प्रेमभावना दाखवणाऱ्या 'लग्नाळू' या गाण्यालादेखील प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. 
या सिनेमात झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस, रितिका शोत्री आणि वैभव मांगले हे कलाकारदेखील आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

Also Read : संजय दत्तच्या ‘भूमी’मधील सनी लिओनीचा ‘आयटम नंबर’ झाला लीक!

Web Title: Sunny Leone's Maratha Style Looks In 'Boyz'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.