अशोकमामांच्या घराबाहेरची नेमप्लेट पाहिली का? सुनील बर्वेंनी केली खात्री, 'धनंजय माने...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 12:08 IST2024-06-22T12:06:37+5:302024-06-22T12:08:01+5:30

अशोक सराफ यांच्या घराबाहेर त्यांनी त्यांच्या नावाची एक खास नेमप्लेट बनवलीय. जी वाचून तुम्हालाही आनंद होईल (ashok saraf)

Sunil Barve nameplate outside ashok saraf house with nivedita saraf | अशोकमामांच्या घराबाहेरची नेमप्लेट पाहिली का? सुनील बर्वेंनी केली खात्री, 'धनंजय माने...'

अशोकमामांच्या घराबाहेरची नेमप्लेट पाहिली का? सुनील बर्वेंनी केली खात्री, 'धनंजय माने...'

अशोक सराफ हे भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते. 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका', 'एक डाव धोबीपछाड', 'सिंघम', 'एक उनाड दिवस' अशा विविध मराठी - हिंदी सिनेमांमधून अशोक सराफ यांनी काम केलं. गेली ४० हून अधिक वर्ष अशोक सराफ मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. अशोक सराफ यांच्याविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट समजलीय. जी वाचून तुम्हालाही आनंद होईल.

अशोक सराफ यांच्या घराबाहेरची खास नेमप्लेट

अशोक सराफ यांची नुकतीच सुनील बर्वेंनी भेट घेतली. सुनील बर्वे यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत दिसल्या. भेट घेतल्यावर सुनीव बर्वे यांनी अशोकमामा आणि निवेदिता या पती-पत्नीसोबत काढलेला सेल्फी पिक्चर पोस्ट केला. यात सर्वांचं लक्ष अशोक सराफ यांच्या दाराबाहेरच्या पाटीकडे गेलंय. अशोकमामांच्या घराबाहेरच्या नेमप्लेटवर लिहिलंय की, "धनंजय माने इथेच राहतात. श्री. अशोक सराफ. द वरजिनल हास्यसम्राट" अशी ही पाटी सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.

सुनील बर्वेंंची खास पोस्ट

हा सेल्फी पोस्ट करुन सुनील बर्वेंनी खास पोस्ट लिहिली आहे. ते लिहितात, "काल एकदा खात्रीच करून घेतली!! ते नक्की इथेच रहातात! . Thank u sooo much निवेदिता सराफ had a blast!" अशाप्रकारे सुनील बर्वेंनी अशोक आणि निवेदिता यांचे आभार मानले. सुनील बर्वे यांनी नुकतंच स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमात अभिनय केला. या सिनेमात त्यांनी संगीतकार सुधीर फडकेंची भूमिका साकारली.

 

Web Title: Sunil Barve nameplate outside ashok saraf house with nivedita saraf