"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 19:04 IST2024-10-26T19:04:06+5:302024-10-26T19:04:40+5:30

सुमीत राघवनलाही वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला आहे. यामुळे संतप्त अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे.

sumeet raghav shared angry tweet after facing huge traffice on toll because of toll free | "आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...

"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काही दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोलमाफी जाहीर केली. पण, या टोलमाफीमुळे टोलनाक्यांवर गर्दी होत असल्याचं चित्र आहे. वाहतूक कोडींमुळे त्रस्त झालेल्या कलाकारांनी याआधी याबाबत पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता. आता सुमीत राघवनलाही वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला आहे. यामुळे संतप्त अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. 

सुमीतने त्याच्या X अकाऊंटवरुन ट्वीट करत सरकारने केलेल्या टोलमाफीच्या निर्णयाचा निषेध केला आहे. या ट्वीटमध्ये त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे. "आम्हाला टोल माफीचे गाजर नको.परिस्थिती जास्त बिकट झाली आहे तुमच्या ह्या टोल माफीच्या निर्णयामुळे. प्रत्येक lane मध्ये वाट्टेल तशी जड वाहनं घुसली आहेत. २५/२५ मिनिटं लागतायत दहिसर टोल पार करायला", असं सुमीतने ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सुमीत राघवन हा मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. मराठीबरोबरच त्याने हिंदी टेलिव्हिजनही गाजवलं आहे. त्याची साराभाई वर्सेस साराभाई ही मालिका प्रचंड गाजली. 

Web Title: sumeet raghav shared angry tweet after facing huge traffice on toll because of toll free