​राजा या चित्रपटात झळकणार सुखविंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 15:25 IST2017-03-25T09:55:13+5:302017-03-25T15:25:13+5:30

राजा या चित्रपटाद्वारे सुखविंदर सिंग मराठी चित्रपटाकडे वळला आहे हे ऐकल्यावर आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सुखविंदरने ...

Sukhwinder Singh to be seen in Raja | ​राजा या चित्रपटात झळकणार सुखविंदर सिंग

​राजा या चित्रपटात झळकणार सुखविंदर सिंग

जा या चित्रपटाद्वारे सुखविंदर सिंग मराठी चित्रपटाकडे वळला आहे हे ऐकल्यावर आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सुखविंदरने अनेक मराठी चित्रपटांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी या गणेश आचार्यच्या आगामी चित्रपटातही तो गाणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. सुखविंदर अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीचा भाग असताना तो आता मराठीकडे कसा वळला आहे. तर याचे उत्तर म्हणजे तो आता मराठीत गाण्यासोबतच अभिनयदेखील करणार आहे.
राजा या चित्रपटातील काही गाणी सुखविंदर गाणार असल्याची बातमी कित्येक दिवसांपूर्वीच आली होती. पण आता या चित्रपटात तो झळकणारदेखील आहे. सुखविंदर या चित्रपटात एका गाण्यात दिसणार असून या गाण्याच्या चित्रीकरणानेच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. 
या चित्रपटातील ‘रातभर... गावभर...  होऊ  दे  बोभाटा... झन झन झनन झनन वाजवू झन्नाटा...’ हे गाणे सुखविंदर सिंगने गायले असून या गाण्यात तो स्वतः आपल्याला दिसणार आहे. सुखविंदर या गाण्यात प्रेक्षकांना एका वेगळ्या अंदाजात दिसणार असून तो या गाण्यात नृत्यदेखील करणार आहे. या गाण्याचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या गाण्यात त्याची वेशभूषादेखील खूप वेगळी असणार आहे. एखाद्या रॉकस्टारप्रमाणे तो या गाण्यात प्रेक्षकांना दिसणार आहे. राजा या चित्रपटाची कथा एका पॉप सिंगरच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक चांगली गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. या चित्रपटात शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: Sukhwinder Singh to be seen in Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.