सुजय रमणार लहान मुलांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 11:59 IST2016-11-26T11:59:49+5:302016-11-26T11:59:49+5:30

काही वर्षापूर्वी शाळा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटातील अभिनेत्री केतकी माटेगांवकरची भूमिका आज ही प्रेक्षकांच्या ...

Sujoy will be in the small children | सुजय रमणार लहान मुलांमध्ये

सुजय रमणार लहान मुलांमध्ये

ही वर्षापूर्वी शाळा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटातील अभिनेत्री केतकी माटेगांवकरची भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आज ही शाळा या चित्रपटाची क्रेझ तरूणांईमध्ये असल्याचे पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे वैशिष्टय ठरले ते या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके. या दिग्दर्शकाने अत्यंत लहान वयात मराठी इंडस्ट्रीमध्ये आपले नाव गाजविले आहे. सुजयचा चित्रपट म्हणजे काहीतरी हटके पाहायला मिळणार असा ही विश्वास प्रेक्षकांमध्ये रूढ झाला आहे. शाळा या लव्हस्टोरीनंतर सुजयने फुँटरू या चित्रपटाकडे पाऊल टाकले होते. त्याच्या या चित्रपटाचीदेखील बरीच चर्चा झाली होती. कारण मराठी इंडस्ट्रीत सुजयने पहिल्यांदा टेक्नोसॉव्ही पध्दतीचा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा हा निर्णय यशस्वीदेखील झाला. मराठीमध्ये वेगवेगळा आशय आणण्याचा सुजय प्रयत्न प्रेक्षकांच्यादेखील पसंतीस उतरताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्याने आजोबा हा वेगळया आशयचा चित्रपटदेखील केला आहे. आता या तीन चित्रपटानंतर सुजय लहान मुलांमध्ये रमणार असल्याचे समजत आहे. सुजय सध्या लहान मुलांची स्क्रिप्ट लिहीण्यात व्यग्र असल्याचे समजत आहे. त्याचबरोबर त्याच्या या चित्रपटामध्ये सर्व नवीन चेहरे झळकणार असल्याचे कळत आहे. यापूर्वी सुजयने वेगवेगळया पध्दतीने शाळा आणि फुँतरू चित्रपटात लव्हस्टोरी दाखविली आहे. आता तो लहान मुलांमध्ये अडकणार आहे. त्याच्या हा आगामी चित्रपट नक्की लहान मुलांच्या कोणत्या विषयावर भाष्य करणारा असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र प्रेक्षकांना सुजयकडून नक्की काहीतरी छान कथा पाहायला मिळेल हे नक्की. त्याचबरोबर त्याच्या दोन चित्रपटात झळकलेली अभिनेत्री केतकी माटेगांवकर या चित्रपटामध्ये वेगळया भूमिकेत पाहायला मिळेल का हा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला असणार आहे हे मात्र नक्की. सुजयला यापूर्वी शाळा या चित्रपटासाठी नॅशनल पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे.

Web Title: Sujoy will be in the small children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.