​ असा अवतरला देहांत कॅनव्हासवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 12:45 IST2016-12-24T12:45:00+5:302016-12-24T12:45:00+5:30

 देहांत या आगामी मराठी चित्रपटाविषयी निर्माते आणि लेखक यांनी एक अनोखी कहाणी नुकतीच उलगडली आहे. या चित्रपटाविषयी निर्माते सदानंद ...

In such incarnation the canvas | ​ असा अवतरला देहांत कॅनव्हासवर

​ असा अवतरला देहांत कॅनव्हासवर

 
ेहांत या आगामी मराठी चित्रपटाविषयी निर्माते आणि लेखक यांनी एक अनोखी कहाणी नुकतीच उलगडली आहे. या चित्रपटाविषयी निर्माते सदानंद लाड सांगतात,  मी आतापर्यंत एकूण बारा मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात बऱ्याच चित्रपटांतून नव्या टॅलेंटला वाव दिला आहे. याही चित्रपटातून तीच पुनरावृत्ती झाली आहे. मीडियात काम करणारे प्रदीपजी आणि भगवानदासजी यांची अचानक भेट झाली. त्यांचा विषय मला भावला आणि म्हणून मी लगेच ह्या चित्रनिर्मितीला होकार दिला. हा विषय अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत असून आपण वेळीच यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. आपली नवी पिढी ह्या विचित्र चक्रात अडकू पाहतेय. कोणाला कसलं भान उरलं नाहीये. अश्याने काही वर्षांनी आपली संस्कृती नेमकी कोणती होती हा प्रश्न पडू लागेल. आपली शिल्लक असलेली कुटुंब व्यवस्था कायमची हद्दपार होईल. आणि यंत्र मानवासारखे भावनाशून्य व्यवहार आणि समाज निर्माण होईल. ही बाब खूप गंभीर वाटल्यामुळे ही कलाकृती हाती घेतली असून ती अधिक सकस व कसदार, रुचकर तयार व्हावी यादृष्टीने एल जी प्रॉडक्शन व अंकुर मुव्हीज मिळून काम करीत आहे.
सर जेजे कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या भगवानदास यांची ही स्वतंत्ररित्या निर्माण होणारी पहिलीच कलाकृती आहे. त्यांनी अनेक मान्यवरांसोबत असोशिएट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. मनाजोगे कथानक आणि प्रदीप म्हापुस्कर यांच्यासोबतचं ट्युनिग यामुळे ही कलाकृती अधिकाधिक दर्जेदार करण्याचे बळ मिळत गेले. वेगळ्या विषयासाठी बराच स्ट्रगल करावा लागतो तो आम्हीही केला. लाड साहेबांमुळे तो कमी झाला असे म्हणता येईल. हा विषय भारतापुरताच मर्यादित नसून जगात सर्वत्र सारखाच आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई महानगरात  सुरु केले आहे. चित्रपटात सर्व रियल लोकेशन्स आहेत.

Web Title: In such incarnation the canvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.