लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,सुबोध भावेची मराठी भाषा दिनी केलेली पोस्ट कौतुकास पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 14:05 IST2019-02-27T14:04:59+5:302019-02-27T14:05:17+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून कुसुमाग्रज यांच्या दोन कवितांचा व्हिडिओ पोस्ट करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Subodh Bhave’s Post on Marathi bhasha din getting applauds | लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,सुबोध भावेची मराठी भाषा दिनी केलेली पोस्ट कौतुकास पात्र

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,सुबोध भावेची मराठी भाषा दिनी केलेली पोस्ट कौतुकास पात्र

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून कलाकार आणि राजकीय मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यानेही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुसुमाग्रज यांच्या दोन कवितांचा व्हिडिओ पोस्ट करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


सुबोध एवढ्यावरच थांबलेला नाही. त्याने या कवितांच्या व्हिडिओसह त्याचे चाहते, मित्र यांनाही एक आवाहन केले आहे. आवडीच्या कविता स्वतःवर चित्रीत करून सर्वांना पाठवा आणि मराठीपणाच्या साखळीत सर्वांना सहभागी करून घ्या असं आवाहन सुबोधने या पोस्टच्या माध्यमातून केले आहे. यावेळी आपल्या मित्रांनाही त्याने ही विनंती केली आहे. सुबोधच्या या पोस्टला चाहत्यांकडून अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळू लागल्यात. मराठी भाषा समृद्ध करण्याचा आणि मराठीपण जपण्यासाठी त्याने केलेल्या या पोस्टचं सर्वत्र कौतुक होत आहे. 
 

Web Title: Subodh Bhave’s Post on Marathi bhasha din getting applauds