सुबोध भावेच्या हस्ते 'या' अभिनेत्रीला मिळाला होता लहानपणी पुरस्कार, आता साकारतेय त्याच्या प्रेयसीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 17:00 IST2018-09-04T16:29:38+5:302018-09-04T17:00:58+5:30

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या तुला पाहते रे या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंती मिळवली आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांच भावली आहे

Subodh Bhave's 'Actor' got the award in her childhood, now she is playing role of his lover | सुबोध भावेच्या हस्ते 'या' अभिनेत्रीला मिळाला होता लहानपणी पुरस्कार, आता साकारतेय त्याच्या प्रेयसीची भूमिका

सुबोध भावेच्या हस्ते 'या' अभिनेत्रीला मिळाला होता लहानपणी पुरस्कार, आता साकारतेय त्याच्या प्रेयसीची भूमिका

ठळक मुद्देसुबोध भावने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे या फोटोत सुबोधसोबत गायत्री दिसतेय

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या तुला पाहते रे या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंती मिळवली आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांच भावली आहे. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी इशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपातंर होते. या मालिकेतून पुण्याची गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. 

सुबोध भावने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे या फोटोत आपल्याला सुबोधसोबत एक लहान मुलगी दिसते आहे. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून गायत्री दातार आहे. या फोटोसोबत सुबोधने एक कॅप्शन देखील लिहिले आहे, ''दुनिया गोल है' काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली होती की मला पण तुमच्याबरोबर काम करायचं, मी म्हणालो नक्की आणि अचानक एक दिवशी 'तुला पाहते रे'च्या सेटवर तिची गाठ पडली.'' मात्र काही वेळातच सुबोधने हा फोटो डिलीट मारला आहे.

 

काही वर्षांपूर्वी गायत्रीला सुबोधच्या हस्ते एका स्पर्धेचा पुरस्कार मिळाला होता. तिच गायत्री आज सुबोधसोबत स्क्रिन शेअर करते आहे. गायत्रीने आपल्या पदार्पणाविषयी बोलताना म्हणाली होती की, '''तुला पाहते रे' या मालिकेतून पदार्पणातच सुबोध भावे सारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करायची सुवर्णसंधी मिळाली याचा मला आनंद आहे.''   
 

Web Title: Subodh Bhave's 'Actor' got the award in her childhood, now she is playing role of his lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.