सुबोध भावेची पहिली मालिका आठवतेय का? त्यानेच शेअर केला आहे पहिल्या मालिकेमधील हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 15:47 IST2019-09-03T15:27:44+5:302019-09-03T15:47:35+5:30

सुबोधने त्याच्या पहिल्या मालिकेच्या आठवणींना सोशल मीडियाद्वारे उजाळा दिला आहे. त्याने त्याच्या या पहिल्या मालिकेचे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Subodh Bhave shares picture of his first serial peshwai | सुबोध भावेची पहिली मालिका आठवतेय का? त्यानेच शेअर केला आहे पहिल्या मालिकेमधील हा फोटो

सुबोध भावेची पहिली मालिका आठवतेय का? त्यानेच शेअर केला आहे पहिल्या मालिकेमधील हा फोटो

ठळक मुद्देसुबोधने त्याच्या पहिल्या मालिकेचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे की, स्मिता तळवलकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित पेशवाई या मालिकेत मी पहिल्या बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारली होती.

सुबोध भावेने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सुबोधने कॉलेज जीवनापासूनच एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली. त्याला त्यावेळी अनेक पारितोषिकं मिळाली होती. त्याने अभिनय करण्यासोबतच दिग्दर्शन देखील केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्याची तुला पाहते रे ही मालिका काही महिन्यांपूर्वी चांगलीच गाजली होती. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाला तर त्याच्या फॅन्सनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सध्या अश्रूंची झाली फुले हे त्याचे नाटक चांगलेच गाजत आहे. तुम्हाला माहीत आहे का, सुबोधची पहिली मालिका कोणती होती? सुबोधने त्याच्या पहिल्या मालिकेच्या आठवणींना सोशल मीडियाद्वारे उजाळा दिला आहे. त्याने त्याच्या या पहिल्या मालिकेचे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सुबोधने त्याच्या पहिल्या मालिकेचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे की, माझी पहिली मालिका झी वाहिनीवर होती. तेव्हा झी वाहिनीचे नाव अल्फा मराठी असे होते. स्मिता तळवलकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित पेशवाई या मालिकेत मी पहिल्या बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारली होती. इतिहासातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व साकारण्याची संधी मला मिळाली होती. 

सुबोध भावेच्या या फोटोला अनेकजण लाईक करत असून तुमची पेशवाई ही मालिका खूपच चांगली होती तसेच तू या फोटोत खूपच छान दिसत आहेस असे त्याचे चाहते त्याला सांगत आहेत तर तू जुन्या गोष्टींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद असे देखील काहींनी कमेंट केले आहे तर ही मालिका आता कुठे पाहायला मिळेल का असे त्याचे चाहते त्याला विचारत आहेत. 

सुबोध भावेने त्याचे शिक्षण पुण्यातील सिम्बोसिस कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्याने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी कंपनीत सेल्समनचे काम देखील केले होते. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते.  

Web Title: Subodh Bhave shares picture of his first serial peshwai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.