​सुबोध भावे आणि त्याचा मुलगा अगडबम 2 या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 18:44 IST2017-03-24T13:14:01+5:302017-03-24T18:44:01+5:30

सुबोध भावेने बालगंधर्व, क्षण, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांमधून तो एक गुणी कलाकार असल्याचे सिद्ध केले आहे. अभिनयात यश ...

Subodh Bhave and his son Agadbam 2 in the film | ​सुबोध भावे आणि त्याचा मुलगा अगडबम 2 या चित्रपटात

​सुबोध भावे आणि त्याचा मुलगा अगडबम 2 या चित्रपटात

बोध भावेने बालगंधर्व, क्षण, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांमधून तो एक गुणी कलाकार असल्याचे सिद्ध केले आहे. अभिनयात यश मिळाल्यानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला. कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळवले. पण त्याचसोबत या चित्रपटाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले. आज सुबोधने अभिनयासोबतच त्याच्या दिग्दर्शन क्षेत्रातदेखील नाव कमावले आहे. त्याचा फुगे हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्या आणि स्वप्निल जोशीच्या मैत्रीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील त्याच्या आणि स्वप्निलच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात त्याच्या लहानपणाची भूमिका त्याचा मुलगा कान्हा याने साकारली होती. पण आता पहिल्यांदाच सुबोध आणि त्याचा मुलगा कान्हा एक चित्रपटात एकत्र झळकताना दिसणार आहे. 
अबडबम 2 या चित्रपटात प्रेक्षकांना ही बाप-लेकाची जोडी पाहायला मिळणार आहे. ही बातमी स्वतः सुबोधनेच त्याच्या चाहत्यांना दिली आहे. सुबोधने ट्वीट करून म्हटले आहे की, मी पहिल्यांदाच माझा मुलगा कान्हा याच्यासोबत काम करणार आहे. मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. अगडबम 2 या चित्रपटात आम्ही झळकणार आहोत. 
अगडबम या चित्रपटात तृप्ती भोईर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तृप्तीने या चित्रपटात अतिशय जाडजूड अशा एका मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची निर्मितीदेखील तृप्तीनेच केली होती तर सतिश मोतलिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर अगडबम 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 



Web Title: Subodh Bhave and his son Agadbam 2 in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.