सुबोध भावेच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन! अशोक सराफांसह ठाकरे बंधू उपस्थित, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:02 IST2025-11-10T15:02:02+5:302025-11-10T15:02:41+5:30

सुबोध भावेच्या बर्थडे पार्टीचा Inside Video व्हायरल!

Subodh Bhave 50th Birthday Celebration Raj Thackeray And Uddhav Thackeray Together And Marathi Celebrities Attend Party Video | सुबोध भावेच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन! अशोक सराफांसह ठाकरे बंधू उपस्थित, पाहा व्हिडीओ

सुबोध भावेच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन! अशोक सराफांसह ठाकरे बंधू उपस्थित, पाहा व्हिडीओ

Subodh Bhave 50th Birthday Celebration : मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सुबोध भावे. वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकांमध्ये काम करून त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. नुकतंच सुबोध भावेनं आपला ५० वा वाढदिवस अत्यंत दिमाखात साजरा केला. रंगभूमीपासून ते थेट सिनेमा आणि दिग्दर्शनापर्यंत आपली स्वतंत्र छाप उमटवणाऱ्या सुबोध भावेच्या वाढदिवशी संपूर्ण मराठी कलासृष्टी एकत्र आली होती. मात्र, या सोहळ्याची खरी चर्चा झाली ती राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या महत्त्वाच्या उपस्थितीमुळे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुबोध भावेला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते.

सुबोध भावेचा ५० वा वाढदिवस अंधेरीतील एका हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. सुबोध भावेच्या या खास सेलिब्रेशनचा Inside Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी संपूर्ण मराठी सिनेसृष्टी एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, गायक बेला शेंडे आणि सुबोधचा जवळचा मित्र व अभिनेता पुष्कर श्रोत्री अशा अनेक कलाकारांची झलक पाहायला मिळाली. सुबोध भावे जेव्हा वाढदिवसाचा केक कापत होता, तेव्हा त्यााचा खास मित्र पुष्कर श्रोत्री याने त्याच्यासाठी खास बर्थडे गाणं गाऊन या क्षणाची गोडी वाढवली. 

ठाकरे बंधूंसह नरेश मस्के होते उपस्थित

या कार्यक्रमाला शर्मिला व राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. ठाकरे बंधू सुबोध भावेला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.  सार्वजनिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे सर्वप्रथम एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर त्यांनी एकत्र दिवाळी साजरी केली होती. आता सुबोध भावे यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात उपस्थित राहिले. ठाकरे बंधू उपस्थित असतानाच या कार्यक्रमात शिवसेनेच्या (शिंदे गट) खासदार नरेश मस्के यांनी देखील सुबोध भावेची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कलाकार आणि राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीमुळे आणि उत्साहामुळे सुबोधचं हे बर्थडे सेलिब्रेशन खूपच खास ठरलं. सोशल मीडियावर चाहत्यांनी सुबोधवर शुभेच्छांचा वर्षाव केला.


Web Title : सुबोध भावे का 50वां जन्मदिन: ठाकरे बंधु, अशोक सराफ शामिल

Web Summary : सुबोध भावे का 50वां जन्मदिन सितारों से भरा रहा। ठाकरे बंधु, राज और उद्धव, अशोक सराफ और अन्य मराठी हस्तियां मुंबई में भव्य समारोह में शामिल हुए। समारोह का एक अंदरूनी वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है।

Web Title : Subodh Bhave's 50th Birthday Bash: Thackeray Brothers, Ashok Saraf Attend

Web Summary : Subodh Bhave's 50th birthday was a star-studded affair. The Thackeray brothers, Raj and Uddhav, along with Ashok Saraf and other Marathi celebrities, attended the grand celebration in Mumbai. An inside video of the celebration is viral on social media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.