कट्यार काळजात घुसली यासारख्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता अभिनेता सुबोध भावे बालनाट्य करीत ...
सुबोधचे बालनाट्य सुपरहिट
/> कट्यार काळजात घुसली यासारख्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता अभिनेता सुबोध भावे बालनाट्य करीत आहे. सध्या रंगमंचावर येणाºया व्यावसायिक अन प्रायोगिक नाटकांकडे पाहता बालनाट्ये लोप पावली आहेत की काय असा प्रश्न पडला होता. तर बालनाट्यप्रेमींना आता आपल्याला रंगभुमीवर बालनाट्य पुन्हा पाहता येईन की नाही अशी चिंता वाटत होती. परंतू थेट सुबोध भावे यांनी चिमुकल्यांसोबत रंगमंचावर येऊन बालनाट्ये सादर केली आहेत. सुबोधच्या या बालनाट्यांना प्रेक्षकांकडुन अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. सुबोधने याबद्दल नूकतेच सोशल साईट्सवर सांगितले आहे. तो म्हणतोय, पुण्यातील बालनाट्याचा शो पुन्हा एकदा हाऊसफुल्ल झाला. क्या बात है सुूबोध बालनाट्यांचे प्रयोग देखील आज हाऊसफुल्ल होत आहेत अन लहान मुलांपासुन ते पालकांपर्यंत सर्वांनाच ते आवडताय ही खरच चांगली गोष्ट आहे.