सुबोधला पडला प्रश्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 16:53 IST2016-09-11T11:18:14+5:302016-09-11T16:53:07+5:30

अभिनेता सुबोध भावे हा मध्यंतरी मालिका, रियालिटी शो, चित्रपट या सर्व गोष्टींमध्ये खूप व्यग्र होता. त्याचप्रमाणे तो दाक्षिणात्य, बंगाली ...

Subhodh question? | सुबोधला पडला प्रश्न?

सुबोधला पडला प्रश्न?

िनेता सुबोध भावे हा मध्यंतरी मालिका, रियालिटी शो, चित्रपट या सर्व गोष्टींमध्ये खूप व्यग्र होता. त्याचप्रमाणे तो दाक्षिणात्य, बंगाली चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाला. नुकतेच त्याच्या फुगे या मराठी चित्रपटाचे चित्रिकरणदेखील  संपले आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवसांचे काही फोटो ही सुबोधने सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. इतक्या बिझी शेडयुलनंतर ही सुबोधला आणखी काम करण्याची इच्छा दिसत आहे. कारण सुबोधने नुकतेच सोशलमीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर पुढे काय?असे स्टेटसदेखील अपडेट केले आहे. तसेच सुबोधने या भावना फोटोतूनदेखील व्यक्त केल्या आहेत. पण सुबोधचे इतके बिझी शेडयुल पाहून, आता थोडा आराम कर असेच म्हणावे वाटते. 



 

Web Title: Subhodh question?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.