Stunning...! अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 20:00 IST2019-09-17T20:00:00+5:302019-09-17T20:00:00+5:30
अमृताने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Stunning...! अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो
वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिने मराठी व हिंदी चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. राझी व सत्यमेव जयते या हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर आता अमृता मलंग या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात केली आहे.
अमृताने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच स्टनिंग दिसते आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगाचा आऊटफिट परिधान केला असून त्यावरील मोठे इअरिंग खूप छान दिसत आहेत.
अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं. तसेच अमृता ‘खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसणार आहे.
लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल.
कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.