‘न्यूड’साठीचा संघर्ष खऱ्या अर्थाने आता सुरू झाला; रवि जाधवने व्यक्त केला निर्धार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 22:07 IST2017-12-01T16:37:41+5:302017-12-01T22:07:41+5:30

‘न्यूड’ चित्रपटाला अखिल भारतीय चित्रपट महामंडळ वगळता कोणीही पाठिंबा दिला नसल्याची खंत बोलून दाखवीत दिग्दर्शक रवि जाधव यांनी आता ...

The struggle for 'Nude' has started now; Ravi Jadhav expressed determination! | ‘न्यूड’साठीचा संघर्ष खऱ्या अर्थाने आता सुरू झाला; रवि जाधवने व्यक्त केला निर्धार!

‘न्यूड’साठीचा संघर्ष खऱ्या अर्थाने आता सुरू झाला; रवि जाधवने व्यक्त केला निर्धार!

्यूड’ चित्रपटाला अखिल भारतीय चित्रपट महामंडळ वगळता कोणीही पाठिंबा दिला नसल्याची खंत बोलून दाखवीत दिग्दर्शक रवि जाधव यांनी आता खºया अर्थाने चित्रपटासाठी संघर्ष सुरू झाला असल्याचा निर्धार व्यक्त केला. एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मराठी-मराठी करणाºयांपैकी कोणीही चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले नसल्याचे म्हटले. त्याचबरोबर इंडस्ट्रीमधील खूपच कमी लोक माझ्या बाजूने उभे राहिल्याचे सांगत त्यांनी हा संघर्ष आता संपला नसून सुरू झाल्याचेही आवर्जून सांगितले. 

न्यूड चित्रपटाबद्दल बोलताना रवि जाधवने म्हटले की, ‘कालच सेन्सॉर बोर्डासोबत बैठक झाली. बैठकीदरम्यान ते चित्रपटाबद्दल सकारात्मक असल्याचे दिसून आले. त्यामुळे अपेक्षा ठेवून आहे. त्याचबरोबर ‘न्यूड’ चित्रपटाला का नाकारले हे मी अजूनही समजू शकलो नाही. मंत्रालयाकडून किंवा ज्युरीकडून मला एकही कॉल आला नाही. चित्रपटाला वगळण्यात आल्याची माहिती मला माध्यमातून कळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच चित्रपट का नाकारला गेला याचे कारणही मी शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुढे बोलताना रवि यांनी सांगितले की, ‘न्यूड नावामुळेच चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याचबरोबर इफ्फीत चित्रपट दाखविण्यासाठी सेन्सॉरच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळाले नसल्याने हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु एक मात्र नक्की, विरोध कितीही होत असला तरी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा निर्धार कायम आहे. 

Web Title: The struggle for 'Nude' has started now; Ravi Jadhav expressed determination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.