'या' सिनेमात तरुणाईच्या दिग्दर्शनाखाली अनुभवी कलाकारांची तगडी फौज..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 15:00 IST2016-11-14T14:51:18+5:302016-11-29T15:00:16+5:30

        Priyanka londhe   मनमर्जिया या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे ...

A strong army of veteran artists under the direction of the film 'Yuga'. | 'या' सिनेमात तरुणाईच्या दिग्दर्शनाखाली अनुभवी कलाकारांची तगडी फौज..

'या' सिनेमात तरुणाईच्या दिग्दर्शनाखाली अनुभवी कलाकारांची तगडी फौज..

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">        Priyanka londhe

  मनमर्जिया या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे कॅमेऱ्याच्या पलीकडची टीम ही सगळीच यंग ब्रिगेड आहे. 25 ते 28 वयोगाटातील दिगदर्शक मयुर करंबळीकर, लेखक मृगेष ओसवाल, सोपान पुरंदरे, प्रोजेक्ट हेड दिनेश पवार या तरुणाईचा हा सिनेमा आहे. तर चित्रपटातील कलाकार हे मात्र दिग्गज आहेत उदय टिकेकर, निशीगंधा वाड, मानसी साळवी आणि शरद पोंक्षे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. उदय टिकेकर या टीमविषयी बोलताना म्हणाले, मयुर, सोपान ही मुले माझ्याकडे आली, त्यांनी मला कथा ऐकवली तेव्हाच मी त्यांचे उत्तम नियोजन बघून लगेचच चित्रपट करण्यास होकार दिला. आज या तरुण टिमसोबत काम करताना खूपच छान वाटतेय.         
       तर शरद पोंक्षे यांनी सांगितले, या मुलांची कामाबाबत असलेली मेहनत लगेच लक्षात येते, त्यामुळे या चित्रपटासाठी नाही म्हणायचे काही कारणच नव्हते. निशीगंधा वाड यांनी सांगितले, खरे तर ही भूमिका याआधी अश्निनी एकबोटे करणार होत्या. मात्र त्यांच्या निधनानंतर या भूमिकेसाठी मला विचारण्यात आले. यानंतर मी होकार दिला या चित्रपटाचे शूटिंग अतिशय उत्साही वातावरणात चालू आहे, या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे त्या म्हणल्या. मानसी साळवीने सांगितले, कथा तर भारीच आहे, मयुर आणि त्याची टीम पण मस्त आहे. बऱ्याच दिवसांपासून मला मराठी सिनेमा करायचा होता. आज या सिनेमात काम करताना खूप आनंद होतोय. सेटवरचे वातावरण पाहाता कुठेही ही तरुण मुले नवीन आहे असे जाणवतच नाही.

            
 
दिग्दर्शक मयुर करंबळीकर सांगतोय, हा माझा तिसरा सिनेमा आहे, पण मला या दिग्गज कलाकारांसोबत काम करुन खूप शिकायला मिळत आहे, सगळेच कलाकार खूप समजून घेतायेत आम्हाला. 
दोन कुटुंबातील फॅमिली, कॉमेडी ड्रामा असलेली तरुणाईला भावणारा हा मनमर्जिया साधारण एप्रिल २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला घेईल. 

Web Title: A strong army of veteran artists under the direction of the film 'Yuga'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.