वज्र सिनेमात दडली गुप्तहेराची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 15:56 IST2017-01-12T15:56:30+5:302017-01-12T15:56:30+5:30
मयूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गुप्तहेराची गोष्ट पाहायला मिळणार आहे ...

वज्र सिनेमात दडली गुप्तहेराची गोष्ट
म ूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गुप्तहेराची गोष्ट पाहायला मिळणार आहे एक हिराच्या तपासाभोवती फिरणारी ही चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटात राहुल सोलापूरकर, उल्हास आढाव, अभिनीत पंगे, समर्थ बारी, मीरा पाथरकर या कलाकारांचा समावेश आहे. तसेच अभिनेत्री मानसी नाईक मुजरा करताना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ' हाय-रब्बा हुस्न ये है, जलवा है ये, सारी रात का मकसद क्या है' या गाण्यावर मानसी नाईक खास तिच्या अदामध्ये मुजरा करताना पाहायला मिळणार आहे. या गाण्याला गायिका श्रीपर्णा चटर्जी हिने स्वर साज चढविला आहे. या चित्रपटातील गाणी चंद्रमोहन यांनी लिहिली आहेत. तसेच त्यांनी या गाण्यांना संगीतसुद्धा दिले आहे. या चित्रपटाचे निर्माते शंतनु देशपांडे आहेत. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक मयूर करंबळीकर सांगतात, ''हा माझा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण करताना खूप मजा आली. पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत गुप्तहेराची कथा घेऊन काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे. आमची संपूर्ण टीम नवीन आणि तरूण आहे. आम्ही सगळ्यांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे काही चित्रिकरण परदेशातदेखील झाले आहे. तसेच माझ्या पहिल्या चित्रपटाला कोल्हापूर आंतरराष्ट्रीय महोत्सवमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे वज्र हा चित्रपटदेखील असे यश मिळवेन अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट 13 जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना फक्त काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.