स्पृहा जोशी या कारणामुळे घरच्यांसोबत साजरी करणार नाहीये दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 18:00 IST2019-10-26T18:00:00+5:302019-10-26T18:00:02+5:30

अभिनेत्री स्पृहा जोशी सुद्धा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची दिवाळी मात्र यासाठी अपवाद आहे.

Spruha Joshi will not celebrate Diwali this time with family because she is shooting for web series | स्पृहा जोशी या कारणामुळे घरच्यांसोबत साजरी करणार नाहीये दिवाळी

स्पृहा जोशी या कारणामुळे घरच्यांसोबत साजरी करणार नाहीये दिवाळी

ठळक मुद्देस्पृहा जोशी याविषयी सांगते, “सध्या मी भोपाळमध्ये माझ्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने सध्या वेगाने चित्रीकरणाचे काम सुरू आहे.

दिवाळी हा सण कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळीसणाला तरी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी सुद्धा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची दिवाळी मात्र यासाठी अपवाद आहे. स्पृहा यंदाच्या दिवाळीत तिच्या घरच्यांसोबत नाहीये तर ती एकटी भोपाळला असणार आहे आणि त्यामुळे ती सध्या तिच्या घरच्यांना खूप मिस करत आहे.

स्पृहा जोशी याविषयी सांगते, “सध्या मी भोपाळमध्ये माझ्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने सध्या वेगाने चित्रीकरणाचे काम सुरू आहे. इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी आहे. त्यामुळे आसपास राहणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांच्या घरी जातील. पण भोपाळपासून मुंबई खूप दूर असल्याने मला घरी पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे मी दिवाळीत भोपाळला अगदी एकटी असणार आहे.”

स्पृहा जोशी पुढे सांगते, “खरं तर दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. आजवरचा इतक्या वर्षांचा माझा नियम होता की, दिवाळीला  घरीच राहायचं. पण यंदा मात्र पहिल्यांदा घरच्यांपासून दूर एकटीच दिवाळीत राहत असल्याने मन भरून आलंय. अशावेळी जाणवतं की, सणाच्यादिवशी आपली माणसं जवळ असणं किती महत्वाचं असतं. मला घरच्यांची खूप आठवण येतेय.”

Web Title: Spruha Joshi will not celebrate Diwali this time with family because she is shooting for web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.