स्पृहा जोशीने नववर्षात व्यक्त केली ही खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 17:02 IST2019-01-03T17:00:04+5:302019-01-03T17:02:07+5:30
स्पृहाने २०१८ वर्षाला निरोप देत त्यावर्षी आलेल्या कटू-गोड आठवणींचा उल्लेख करत एक प्रेररणादायी पोस्ट स्पृहाने आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केली आहे. यासोबतच पोस्टमधून तिने खंतदेखील व्यक्त केली आहे.

स्पृहा जोशीने नववर्षात व्यक्त केली ही खंत
चित्रपट, नाटक व मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीने रसिकांना भुरळ पाडली आहे. अभिनयासोबतच स्पृहा लेखिका व उत्तम कवियत्री आहे. छोट्या पडद्यावरील बच्चे कंपनीच्या रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करून तिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मने जिंकली आहेत. नुकतेच स्पृहाने २०१८ वर्षाला निरोप देत त्यावर्षी आलेल्या कटू-गोड आठवणींचा उल्लेख करत एक प्रेररणादायी पोस्ट स्पृहाने आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केली आहे. यासोबतच पोस्टमधून तिने खंतदेखील व्यक्त केली आहे.
स्पृहा जोशीने या वर्षात आलेले अनेक अनुभव तिने खुद्द चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. कधी शारिरीक टिप्पणी तर कधी ती प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरवल्याने अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी तिला काम नाकारले होते. आपण सगळ्यांशी मनापासून प्रेमाने वागूनही आपल्याला पाण्यात पाहणारे इतके लोक आहेत याचे खूप दुःख स्पृहाला झाले. पण मग एका पॉईंटला तिचे डोळे खडखडून उघडले. तिने आता नवीन वर्षात या सर्व आव्हानांवर मात करत कठोर परिश्रमाच्या जोरावर सामोरे जायचे ठरवले आहे.
स्पृहाने शेअर केलेली पोस्ट कटू व गोड आठवणींनी भरलेली असली तरीदेखील ती प्रेरणादायी आहे.