सचितने ब्लॉग लिहिण्याचं मनावर घेतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 15:02 IST2016-09-02T09:32:24+5:302016-09-02T15:02:24+5:30
‘ब्लॉगर’ सचित पाटील सोशल नेटवर्किंग साईटसमुळे प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठीच एक सशक्त माध्यम उपलब्ध झालं आहे. व्यक्त होण्यासाठी एवढं चांगलं माध्यम ...
.jpg)
सचितने ब्लॉग लिहिण्याचं मनावर घेतलं
सोशल नेटवर्किंग साईटसमुळे प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठीच एक सशक्त माध्यम उपलब्ध झालं आहे. व्यक्त होण्यासाठी एवढं चांगलं माध्यम उपलब्ध असताना आपले कलाकार तरी मागे कसे राहतील. क्षणभर विश्रांती, झेंडा, अर्जुन, क्लासमेटस यासारख्या चित्रपटांमधून उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या हॅण्डसम अभिनेता सचित पाटीलने सुद्धा ब्लॉग लिहिण्याचं मनावर घेतलं आहे. सचितच्या या ब्लॉगवर त्याने नेमकं कायलिहिलंय हे पाहण्यासाठी वन वे तिकीट सिनेमा तुम्हाला पहावा लागेल.
सचित पाटील ‘ब्लॉगर’ म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सचित सांगतो की, मी प्रत्यक्षात कधी ब्लॉग लिहिला नसला तरी वन वे तिकीटच्या निमित्ताने मला ब्लॉग लिहिण्याची संधी मिळाली, या ब्लॉगवर मी नेमकं काय लिहिणार? व त्यामुळे काय घडणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.