उमेश कामतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रिया बापटची खास पोस्ट, व्यक्त केल्या ७ इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:09 IST2023-12-12T13:09:08+5:302023-12-12T13:09:32+5:30
Umesh Kamat And Priya Bapat : आज उमेश कामतचा ४५वा वाढदिवस असून या निमित्ताने प्रिया बापटने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

उमेश कामतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रिया बापटची खास पोस्ट, व्यक्त केल्या ७ इच्छा
मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वांची लाडकी जोडी म्हणजे उमेश कामत-प्रिया बापट (Umesh Kamat-Priya Bapat). अनेक वर्ष डेटिंग आणि नंतर संसार अशा प्रकारे गेल्या १७ वर्षांपासून दोघंही एकमेकांची साथ निभावत आहेत. एक आदर्श जोडी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. आज उमेश कामतचा ४५वा वाढदिवस असून या निमित्ताने प्रिया बापटने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया बापट हिने इंस्टाग्रामवर उमेश कामतसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सात फोटो आणि सात इच्छा व्यक्त करत उमेशला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, माझा प्रिय उमेश, माझ्या आयुष्यात तुझे असणे हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे. तू माझ्या प्रत्येक गुन्ह्यातील सोबती, मला कसे चिडवायचे आणि माझ्यावर कसे प्रेम करायचे हे ज्याला माहित आहे! अशा गोड, त्रासदायक आणि अमर्याद प्रेमाला शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
प्रियाने पुढे सात इच्छा व्यक्त केली. तिने लिहिले की, हे एकजुटीने भरलेले आयुष्य आहे. तुला खेळकरपणे चिडवण्याचा आनंद कायमचा मिळावा अशी आशा. आम्ही शेयर करत असलेला सुंदर वेडेपणा सदैव जिवंत राहू दे. सूर्यप्रकाश आणि वादळ या दोन्हीमध्ये तुझ्या पाठीशी उभे राहण्याची इच्छा आहे. आपल्या आई - बाबांचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असू दे. तू शरिवाचा सर्वात लाडका व्यक्ती असशील. आई आणि बाबा तुझ्यावर वरून लक्ष ठेवताय, प्रेम आणि यशासाठी आशीर्वाद देत आहेत.
प्रिया बापटच्या या पोस्टला चाहत्याची पसंती मिळत असून ते या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.