वृंदावनला साऊथचा तडका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 09:59 IST2016-04-08T16:59:30+5:302016-04-08T09:59:30+5:30
मसालाा... अॅक्शन... कॉमेडी... रोमान्सचा तडका असलेला आणि साऊथचा टच असुन देखील मराठीची चव असलेल्या वृंदावन ...

वृंदावनला साऊथचा तडका
चित्रपटांमध्ये जोरजार अॅक्शन्स सीन्स असले की तो चित्रपट आपसुकच सुपरहिट होतो असाच ट्रेंड सध्या पहायला मिळत आहे. वृंदावन या सिनेमामध्ये देखील राकेश बापटने खलनायकांची जबरदस्त धुलाई केली असुन पॉवर पॅक अॅक्शन सीन्स केले आहेत. राकेश या अॅक्शन सीक्वेन्स बद्दल सांगताना म्हणतो, मला फाईट करताना फारच मजा आली. मी काहीतरी अॅडवेंचरस करतोय असेच मला वाटायचे. भर तापत्या उन्हात फआऊट सीन्स करताना अंगाचा कोळसा झाला होता, परंतू एवढ्या उन्हात आम्ही शुटिंग कम्लिट केले. एकदा सीन करताना मला दुखापत झाली होती. त्यानंतर माझी सेटवर रोजच दृष्ट काझली जायची. सीन सुरु व्हायच्या आधी अन संपल्यानंतर रोज मला आरतीच्या ताटातून ओवाळले जायचे. साऊथकडील लोक हिरोला देव मानतात. आणि प्रचंद रिसपेक्ट देतात. त्यांच्या या प्रेमापोटीच माझी रोज दृष्ट काढली जायची.