दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवात झळकणार 'डॉ. रखमाबाई' सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 15:10 IST2017-03-04T09:31:00+5:302017-03-04T15:10:29+5:30
लवकरच डॉ. रखमाबाईंचा लढा रसिकांना रूपेरी पडद्यावर ‘डॉक्टर रखमाबाई’ सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनंत महादेवन ...
दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवात झळकणार 'डॉ. रखमाबाई' सिनेमा
ल करच डॉ. रखमाबाईंचा लढा रसिकांना रूपेरी पडद्यावर ‘डॉक्टर रखमाबाई’ सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले आहे.विशेष म्हणजे ‘RULES DON’t APPLY’या ब्रीदवाक्यातून आपले जीवन घडवणाऱ्या डॉ. रखमाबाई हा सिनेमा मानाचा समजला जाणाऱ्या ‘दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवा’त दाखवला जाणार आहे. हा सिनेमा सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ‘डॉक्टर रखमाबाई’ सिनेमाचा टीझर 'दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवाच्या सोशल मिडीया पेजवर लाँच करण्यात आला.
या टीझरमध्ये अठराशेच्या दशकात स्त्रियांना सोसावे लागणारे अत्याचार, त्यांना वेठीला धरणारी मागासलेली विचारसरणी, डॉ.रखमाबाईंना त्यांच्या बाबांची लाभलेली साथ आणि डॉ. रखमाबाईंची 'डॉक्टर' होण्याची जिद्द आपल्याला पाहायला मिळतेय.डॉक्टर रखमाबाईंच्या जिद्दीला सलाम करत दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता या सिनेमाने करण्यात येणार आहे.या महोत्सवात डॉक्टर रखमाबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जींशी उपस्थितांशी संवादही साधणार आहे. डॉक्टर रखमाबाई साकरताना आलेले अनुभव, शूटिंग दरम्यान तिने या भूमिकेसाठी केलेली तयारी यासारखे काही खास खिस्सेही यावेळी तिनष्ठाकडून जाणून घेता येणार आहे.बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी सिनेमात पदार्पण करत आहे.
या सिनेमाची निर्माती डाॅ.स्वप्ना वाघमारे यांना निर्मितीसाठी हाच विषय का निवडला असा प्रश्न विचारण्यात आला,त्यावर एका आदर्श स्त्रीचा प्रवास समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने या सिनेमाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगिलते.अठराव्या दशकात स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या यातना आजही तशाच आहेत.कपडे बदलले असले तरी मानसिकता तीच आहे.शिक्षणाने माणूस मोठा होतो.त्याचे विचार बदलतात असे आपण कितीही म्हटले, तरी हा केवळ भ्रम असून परिस्थिती ही मनोवृत्तीवर अवलंबून असते.जोपर्यंत या समाजाची स्त्रीकडे पाहण्याची वृत्ती बदलत नाही तोपर्यंत स्त्रीच्या परिस्थितीत बदल शक्य नसल्याचे, डॉ. स्वप्ना सांगतात. मुद्दा, बालविवाहाचा असो किंवा स्त्री अत्याचाराचा हे सगळेच प्रश्न आजही तितकेच ताजे आहेत.याच सगळ्या विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम हा सिनेमा करणार आहे.