मधुर भांडारकरच्या हस्ते “ही आठवण " गाण्याचे ध्वनिफीत प्रकाशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 11:52 IST2017-04-03T06:22:20+5:302017-04-03T11:52:20+5:30

'होळीचा सण लय भारी' (लय भारी), 'अगं बाई अरेच्चा' मधील प्रभात गीत  तसेच  हिंदी सिनेमा ट्रॅफिक सिग्नल मधील, 'ना ...

Soundtrack released by "Madhum Bhandarkar" on "This Remembrance" song! | मधुर भांडारकरच्या हस्ते “ही आठवण " गाण्याचे ध्वनिफीत प्रकाशन!

मधुर भांडारकरच्या हस्ते “ही आठवण " गाण्याचे ध्वनिफीत प्रकाशन!

'
;होळीचा सण लय भारी' (लय भारी), 'अगं बाई अरेच्चा' मधील प्रभात गीत  तसेच  हिंदी सिनेमा ट्रॅफिक सिग्नल मधील, 'ना जिस दिन तेरी मेरी बात होती है'... ही आणि या सारखी अनेक  हिट गाणी देणारी गायिका योगिता गोडबोलेचे नुकतेच ही आठवण या गाण्याचे ध्वनिफीतचे मधुर भांडारकरच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तिचे "ही आठवण" रोमँटिक गाणे आहे. सध्या सिनेमाप्रमाणेच मराठी संगीत विश्वात अनेक बदल होत आहेत.अनेक नावाजलेले गायक आणि गायिका त्यांचे स्वतःचे टॅलेंट दाखवण्यासाठी वेगेवेगळे प्रयोग करत आहेत.त्यामुळेच योगितानेही एक प्रयोग म्हणून हे गाणे रसिकांच्या भेटीला आणले आहे.या गाण्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे,सत्य घटना आणि समाजाशी निगडीत विषयांवर चित्रपट बनविण्यास प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकरने हे गाणे रसिकांच्या पसंतीस उतरेन असा विश्वास व्यक्त केला आहे.'ट्रॅफिक सिग्नल' हा मधुर भांडारकरचा गाजलेला सिनेमा. त्यातील अनेक गाणी प्रसिद्ध होती. मात्र एक गाणे मधुर भांडारकर यांचे आवडते आहे ते म्हणजे "ना जिस दिन तेरी मेरी". आणि हे गाणे मधुरने योगिताकडून गाऊन घेतेले होते. योगितामध्ये पूर्ण टॅलेंट आहे फक्त त्याला गरज आहे एक संधीची हे गोष्ट ओळखताच मधूरने या गाण्यासाठी योगिताची निवड केली होती. योगितानेही मधूरचा विश्वास आणि मिळालेल्या संधीचे सोने केले.  त्यामुळेच तिच्या या नवीन गाण्याचे प्रकाशन करण्यासाठी मधुर भांडारकर योगिताच्या एका विनंतीला मान देत या कार्यक्रमाला उस्थित होते.



 
या प्रसंगी मधुर भंडारकर यांनी योगिता बद्दल सांगितले, कि "मी योगिता आणि तिच्या संपूर्ण टीमचे 'ही आठवण' या सुंदर गाण्याबद्दल अभिनंदन करतो, त्यांनी ज्या प्रकारे एवढे सुंदर गाणे बनवले आहे आणि ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली आहे ती फारच सुंदर आहे. ही आठवण हे गाणे योगिता सुंदर गायली आहेच पण मी आश्चर्यचकित आहे तिचे अभिनय कौशल्य बघून. योगीताने सिंगल गाणे बनवून एक चांगली सुरुवात केली आहे आणि मला खात्री आहे हा प्रवास तिला खूप उंचीवर नेईल".योगिता गोडबोले यांचे "ही आठवण" हे गाणे, एक रोमँटिक सॉंग असून, एका प्रेमिकेची विरह भावना आणि  प्रियकराच्या भेटीचं सुंदर वर्णन यात दाखवले गेले आहे. हे गाणे पावसातील नयनरम्य वातावरणात पुण्यात शूट केले असून वैभव जोशीने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तसेच हे गाणे सौरभ ऋषिकेश आणि जसराज या प्रसिद्ध संगीतकारांनी संगीतबद्द केले आहे.

Web Title: Soundtrack released by "Madhum Bhandarkar" on "This Remembrance" song!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.