​मन की आवाज प्रतिज्ञा फेम संदेश गौर भला माणूस या मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 10:44 IST2017-03-02T05:14:08+5:302017-03-02T10:44:08+5:30

संदेश गौरने मन की आवाज प्रतिज्ञा, सूर्या द सुपर कॉप्स, सरस्वतीचंद्र, सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स, मेरी आशिकी तुम से ही, ...

Sound of the mind Vivek Fame Message Gaur Bhaal Jan in Marathi film | ​मन की आवाज प्रतिज्ञा फेम संदेश गौर भला माणूस या मराठी चित्रपटात

​मन की आवाज प्रतिज्ञा फेम संदेश गौर भला माणूस या मराठी चित्रपटात

देश गौरने मन की आवाज प्रतिज्ञा, सूर्या द सुपर कॉप्स, सरस्वतीचंद्र, सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स, मेरी आशिकी तुम से ही, तारक मेहता का उल्टा चष्मा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. तसेच त्याने काही नाटकांत आणि वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे. त्याने मीराधा या हिंदी चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती. त्याचा हा चित्रपट अनेक फेस्टिव्हल्समध्येदेखील गाजला होता. या चित्रपटासाठी त्याला एका इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. आता संदेश मराठी चित्रपटाकडे वळला आहे. 
संदेश भला माणूस या चित्रपटात काम करणार असून या चित्रपटाचा मूहूर्त नुकताच पार पडला. संदेश हा मुळचा नागपूरचा आहे. त्यामुळे त्याला मराठी चित्रपटांविषयी प्रचंड प्रेम आहे.
भला माणूस या चित्रपटात जगातील आणि देशभरातील लोक कोण कोणत्या परिस्थितीत राहात आहेत हे दाखवण्यात येणार आहे आणि या चित्रपटाद्वारे एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रेम झामनानी आणि दिनेश गोलानी यांची असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय गुमगावकर करणार आहेत. या चित्रपटाला मोरेश्वर निस्ताने यांनी संगीत दिले असून सुरेश वाडकर, बेला शेंडे आणि राहुल सक्सेना यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. 
या चित्रपटात संदेशसोबत आकांक्षा साखरकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तसेच अनिल पालकर, चैताली भस्मे, रिषम गोलानी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या मुहूर्ताला या चित्रपटाच्या कलाकारांसोबत सगळी टीम उपस्थित होती.  



Web Title: Sound of the mind Vivek Fame Message Gaur Bhaal Jan in Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.