पहिल्या धारेचा सुर.. रखुमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 10:30 IST2016-04-18T04:57:13+5:302016-04-18T10:30:33+5:30
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी.... रखुमाई रखुमाई.... आवाज वाढव डिजे... गुलाबाची कळी... ...
.jpg)
पहिल्या धारेचा सुर.. रखुमाई
पुर्वीपासुनच आपण जर पाहिले तर गाण्यांमुळे चित्रपट सुपरहिट होण्याचे प्रमाण जास्त होते अन आजही तोच ट्रेंड आहे. मराठी प्रेक्षक देखील म्युझिकल आहेत. चित्रपटात गाणे हे पाहिजेच, सिनेमामध्ये गाणे अतिशय महत्वाची बाजु असते अशी मेंटॅलिटीच इंडियन आॅडियन्सची असते. आर.डी बर्मन यांच्या काळापासुनच हिट गाण्यांमुळे पाहिले गेलेले अनेक चित्रपट आहेत. मराठी सिनेमांमध्ये वेगळ संगीत येतय. प्रेक्षक सुद्धा क्लास-मास मध्ये अडकलेले नाहीत. नवीन गाणी आजची आॅडियन्स खास करुन तरुणाई अॅक्सेप्ट करीत आहेत. त्यामुळे मराठीमध्ये सध्या सुरु असलेला म्युझिक एक्सपिरिमेंट सक्सेसफुल होतोय असे म्हणायला काही हरकत नाही.
कोणत्याही चित्रपटाचा दिग्दर्शक हा त्या सिनेमाचा कॅप्टन असतो. त्यामुळे त्या परटिक्युलर सिनेमासाठी दिगदर्शकाला कोणत्या प्रकारची गाणी अपेक्षित आहेत, त्यांचे काय मत आहे हे जाणुन घ्यावे लागते. कधी कधी अशावेळेस गाणी कम्पोझ करताना तुमच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. परंतू सुदैवाने मला कधी तसा अनुभव आला नाही. ९० टक्के गाणी ही चालींवर तयार होतात. अगोदर चाल तयार केली जाते अन मग त्यावर शद्ब रचले जातात. बºयाचदा चित्रपटांसाठी दिग्दर्शकांना मेलेडी साँग्जच पाहिजे असतात. दिग्दर्शकाने जर एकाच संगीतकाराकडे संपुर्ण सिनेमा दिला तर त्याला त्यामध्ये चार वेगवेगळ््या प्रकारची गाणी करता येतात. जसे पोश्टर गर्ल मध्ये एकीकडे रखुमाई गाणे आहे तर दुसरीकडे तरुणाईला भुरळ पाडणारे आवाज वाढव डिजे आहे. असे व्हेरिएशन्स मग आपल्याला गाण्यांमध्ये करता येतात
प्रत्येक गायकाच्या आवाजाचा एक वेगळा बाज असतो त्यांचा डिफरंट जॉनर असतो. काही ठराविक पठडीतील गाणी त्या त्या गायकांच्या आवाजाला सुटेबल असतात. आदर्श शिंदेला जर रोमँटिक गाणे गायला लावले तर तर तो गाईल परंतू त्याला ते त्याच्या पद्धतीने. तसेच प्रत्येक सिंगरच्या गाण्याच्या वेळा, आवाज, जॉनर या सर्व गोष्टी ठरलेल्या असतात. आजकालच्या संगीत रिअॅलिटी शोज मधुन चांगले टॅलेन्ट येत असले तरी काहीवेळेस त्यांचे शुटिंग शेड्युल्ड जाम असल्याने त्या ठराविक वेळी गायकाचा सुर लागेलच असे नाही. मग परिक्षकांकडुन मिळालेल्या निगेटिव्ह कमेंट्समुळे तो सिंगर डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. एकदा गायक तणावाखाली गेला कि त्याला त्यातुन बाहेर काढणे फार अवघड असते.
...............................................................................................
पोश्टर गर्ल मधील रखुमाई रखुमाई हे गाणे सध्या फार गाजत आहे. या गाण्या मागची कहाणी फार भन्नाट आहे. क्षितीज पटवर्धन याने या गाण्याचे बोल लिहीले आहेत. हा सिनेमा स्त्रीभ्रुण हत्येवर भाष्य करणारा असल्याने त्यामध्ये काहीतरी वेगळे म्हणजेच रखुमाईवर गाणे असायला हवे असे आम्हाला वाटले. आजवर विठ्ठलावर अनेक गाणी येऊन गेली परंतू रखुमाईवर गाणे नव्हते मग एक दिवस मला वैभवने शब्द पाठवले रखुमाई... रखुमाई अन काय चमत्कार झाला मला माहित नाही मी जेव्हा ते गाणे वाचायला गेलो तेव्हा डायरेक्ट ते चालीमध्येच गायले. त्यामुळे रखुमाईसाठी मला मिळालेला सुर हा पहिल्या धारेचाच होता.
रात्री २ वाजता गाणे गायले
७२ मैल एक प्रवास या चित्रपटातील रान भैरी हे गाणे घएऊन दिग्दर्शक राजीव पाटिल माझ्याकडे आले. त्यानी मला सांगितले गाणे तयार आहे तु फक्त कम्पोज कर. काही झाले तरी लिरीक्स चेंज करायचे नाहीत. रात्री त्यांनी गाण पाठवल अन सांगितले परवा शुट आहे तेव्हा मला गाण तयार करु दे. मला काही सुचेना मी रात्रीत घरात तानपुरा घेऊन बसलो अन शेवटी रात्री २ वाजता गाणे रेकॉर्ड करुन ते राजीव पाटील यांना मोबाईलवर पाठवले. त्यांना गाणे एवढे आवडले कि त्यांनी संपुर्ण टिमला रात्रीत जागे केले अन गाणे ऐकवले. ते गाणे ऐकुन अक्षय कुमार म्हणाले हे गाणे असेच चित्रपटात राहुद्या साध्या माईकवर माझ्या आवाजात रेकॉर्ड केलेले ते गाणे चित्रपटात तसेच घेण्यात आले आहे.