सोनू, श्रेया आणि अमितराज 'देवा' मधून प्रथमच एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 15:00 IST2017-11-08T09:30:29+5:302017-11-08T15:00:29+5:30
'देवा' या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'रोज रोज नव्याने' हे गाणे लॉच झाले.इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स ...
सोनू, श्रेया आणि अमितराज 'देवा' मधून प्रथमच एकत्र
सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना देवा या आगामी मराठी सिनेमाने मात्र वेगळी वाट धरलीय.मोठा गाजावाजा न करता शांततेत देवा या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.आता तुम्हीही विचारात पडला असणार की शांततेत जोरदार प्रमोशन कसं बरं होत असेल ? तस होय, देवा सिनेमाने प्रमोशसाठी एक भन्नाट कल्पना शोधुन काढली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम. मध्ये या सिनेमाचा टीझर दाखविला जात आहे. हा टीझर २० सेकंदाचा असून, यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘देवा’ सिनेमाचा बोलबाला केला जात आहे. विशेष म्हणजे, ए.टी.एम.द्वारे अशाप्रकारे सिनेमाचा टीझर दाखवण्याची हि पहिलीच वेळ असून,ह्या अतरंगी संकल्पनेचे कौतुकदेखील होताना दिसून येत आहे.आपल्या अभिनयाबरोबरच भूमिकेतदेखील नाविण्यपण जपणाऱ्या अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची अशी होत असलेली प्रसिद्धी,प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरत आहे.