ह्दयात वाजे समथिंग.. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 13:31 IST2016-12-27T13:30:46+5:302016-12-27T13:31:58+5:30

 मराठी चित्रपटसृष्टीतील ती सध्या काय करते या चित्रपटाची चर्चा जोर धरू लागली आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. ...

This song is coming to the audience's liking | ह्दयात वाजे समथिंग.. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे

ह्दयात वाजे समथिंग.. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे

 
राठी चित्रपटसृष्टीतील ती सध्या काय करते या चित्रपटाची चर्चा जोर धरू लागली आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा सोशलमीडियावरदेखील रंगत असल्याचे दिसत आहे. तसेच या चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र या चित्रपटातील ह्दयात वाजे समथिंग हे गाणे प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्याची सोशलमीडियावरदेखील धूम असल्याची दिसत आहे.कारण कित्येक तरूणांईने आपल्या व्हॉटसअ‍ॅपचे स्टेटसच ह्दयात वाजे समथिंग करून ठेवले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मोबाईलची रिंगटोनदेखील ह्दयात वाजे समथिंग असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. ही गाणी  निलेश मोहरीर, अविनाश - विश्वजित आणि मंदार आपटे यांनी संगीतबद्ध केली आहेत. यामध्ये जरा जरा आणि परिकथेच्या पºया ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केली असून ती आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत. हृदयात वाजे समथिंग हे गाणं विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलंय आहे. तर या गाण्याला हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी आपल्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकली आहे. तसेच निखिल साने आणि असंख्य प्रोडक्शनच्या पल्लवी राजवाडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे असून, पटकथा आणि संवाद मनस्विनी लता रवींद्र यांचे आहेत. सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या टिझरला काही दिवसांतच पाच लाखाहुन जास्त व्हयूव्ज मिळाले असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच ६ जानेवारीला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात  अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आदि कलाकारांचा समावेश आहे. 
.




 

Web Title: This song is coming to the audience's liking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.