सोनाली करणार मराठीत आयटम साँग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 15:51 IST2016-11-28T15:51:53+5:302016-11-28T15:51:53+5:30
सोनाली राऊत हे नाव काही आता कोणाला नवीन नाही. सोनालीने बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर किंगफिशरची मराठमोळी कॅलेंडर गर्ल सोनाली ...
(10).jpg)
सोनाली करणार मराठीत आयटम साँग
स नाली राऊत हे नाव काही आता कोणाला नवीन नाही. सोनालीने बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर किंगफिशरची मराठमोळी कॅलेंडर गर्ल सोनाली राऊत आता मराठी सिनेमात येण्यासाठी सज्ज झाली आहे. सोनालीने 'किंगफिशर कॅलेंडर गर्ल' स्पर्धा जिंकली आणि बॉलिवूडचे दरवाजे तिच्यासाठी खुले झाले. सर्वप्रथम हिमेश रेशमियाच्या 'द एक्सपोज' मधून झळकलेल्या सोनालीने या चित्रपटात नकारात्मक भूमिका रंगविली होती. रणवीरसोबत एका जाहिरातीसाठी तिने केलेलं एक हॉट फोटोशूट खूपच चर्चेत राहिलं. त्याचबरोबर ग्रेट ग्रँण्ड मस्ती या चित्रपटातील लिपस्टिक लगाके हे सोनालीवर चित्रित झालेलं गाणं तिच्या बिनधास्त अदांनी चांगलंच गाजलं. सोनाली बिग बॉस ८ तसेचझलक दिखला जा सीझन ९ मध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. आगामी हिरो या मराठी सिनेमातलं एक धमाकेदार आयटम सॉंग सोनालीवर लवकरच चित्रित होणार आहे, आणि त्या निमित्ताने ग्लॅमरस सोनाली मराठी पडद्यावर प्रथमच पहायला मिळणार आहे. हिरो चित्रपटातील सोनालीचा हा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की. अनेक बिनधास्त, बेधडक मॉडेल्सनी आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये व बॉलिवूडमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. विशेषत: बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी किंगफिशर कॅलेंडर गर्ल हे एक उत्कृष्ट व्यासपीठ मानले जाते. आता सोनालीचे हे नवीन मराठमोळं आयटम साँग प्रेक्षकांना किती आवडतेय हे आपल्याला लवकरच समजेल.
![]()
![]()
![]()