/> लाईट्स, कॅमेरा आणि अॅक्शनच्या या झगमगाटात अजुन एक शब्द अॅड होतो, आणि तो म्हणजे फोटोशुट. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज फोटोग्राफर आहेत ज्यांच्या कॅमेरात बंदिस्त होण्यासाठी सेलिब्रिटीज धडपडतात. तर काहीजण आपल्या फ्रेन्ड्स फोटोग्राफरसाठी केवळ मैत्री खातर ग्लॅमरस फोटोशुट करतात. सोनाली कुलकर्णीने देखील असेच एक फोटोशुट केले आहे. तिचा मित्र हर्षद मुजुमदार याच्यासाठी सोनालीने थिम फोटोशुट केले आहे. काठापदराची साडी, गळ््यात मोत्याची माळ, टिकली, बांधलेल्या केसांची वेणी, अशा ट्रॅडीशनल लुकमध्ये सोनाली या फोटोशुटच्या वेळी पहायला मिळत आहे. आय अॅम एक्ट्रीमली लव अॅन्ड थ्रिव अपॉन फोटोशुट, डायिंग टू सी द फायनल रिझल्ट या शब्दात सोनालीने तिची एक्साईटमेंट दाखवुन दिली आहे. मित्रासाठी केलेले हे फोटोशुट तिच्या चाहत्यांना किती भुरळ पाडतात ते लवकरच समजेल.