सोनाली झाली निर्मितीची फॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:31 IST2016-08-31T10:01:34+5:302016-08-31T15:31:34+5:30
कलाकारांचे चाहते तर अनेक असतात. परंतू एखादा कलाकार जर दुसºया कलाकाराचा फॅन आहे ...
(4).jpg)
सोनाली झाली निर्मितीची फॅन
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
कलाकारांचे चाहते तर अनेक असतात. परंतू एखादा कलाकार जर दुसºया कलाकाराचा फॅन आहे असे जर सांगितले तर थोडे नवल वाटेल ना. पण काही गोष्टींना जसे अपवाद असतात ना तसेच काहीजण खुल्या मनाने आपल्या सहकलाकाराच्या अभिनयाची तारीफ करतात. आता हेच पाहा ना, सोनाली कुलकर्णी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत देखील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या सिनेमांची गाडी तर सुसाट सुटली आहे. आज सोनालीचे लाखो चाहते आपल्याला पाहायला मिळतील पण सोनाली कोणाची फॅन आहे हे तुम्हाला माहितीय का ? कॉमेडिची क्वीन निर्मिती सावंतची सोनाली जबरी फॅन आहे. अहो असे आम्ही सांगत नाही तर सोनाली स्वत: असे सोशल साईट्सवर म्हणत आहे. नूकताच सोनालीने ट्विटरवर निर्मिती सावंत आणि प्रसाद ओक यांच्या सोबतचा फोटो अपलोड केला आहे. आणि सोनाली म्हणतेय, निर्मिती सावंत की मै जबरदस्त फॅन हु! आणि एवढेच नाही तर निर्मितीच्या ड्रेसिंग स्टाईलवरही सोनाली फिदा असल्याचे ती सांगते. निर्मितीने अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भुमिका केल्या आहेत. तिच्या विनोद शैलीचे कौतुक तर सर्वांनीच केले होते. आज निर्मितीचा विशिष्ठ आसा एक चाहता वर्ग आहे. आणि आता निर्मितीच्या चाहत्यांमध्ये सोनालीची देखील भर पडली आहे असेच म्हणावे लागेल.