सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीच्या फोटोंना मिळते अधिक पसंती,काय आहे त्यामागचे गुपित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 08:00 IST2019-02-28T08:00:00+5:302019-02-28T08:00:00+5:30
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीच्या फोटोंना मिळते अधिक पसंती,काय आहे त्यामागचे गुपित?
मराठी सिनेसृष्ट्रीत पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. मराठी अभिनेत्रींच्या करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.
याच यादीत सगळ्यात जास्त ग्लॅमरस मराठमोळी अभिनेत्री म्हणून सोकुल सोनाली कुलकर्णी ओळखली जात आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.
चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते. वयाच्या चाळीशीतही सोनाली कुलकर्णी फारच ग्लॅमरस दिसते.
सोनालीला सायकलिंगची आवड आहे. ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते. आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
दररोज सकाळी साडेचार वाजता उठून ती दोन-तीन किलोमीटर रनिंग करते आणि 20-25 किमी सायकलिंग करते. रविवारी सुट्टी असली तरी ती सोनाली आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.