सोनाली कुलकर्णीची हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 18:02 IST2017-02-12T12:32:13+5:302017-02-12T18:02:13+5:30

फोटोशुट हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. हल्लीचे लोक हे फोटोशुटच्या खूपच प्रेमात पडलेले दिसत आहेत. कारण काही लोक खास ...

Sonali Kulkarni's favorite | सोनाली कुलकर्णीची हटके अदा

सोनाली कुलकर्णीची हटके अदा

टोशुट हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. हल्लीचे लोक हे फोटोशुटच्या खूपच प्रेमात पडलेले दिसत आहेत. कारण काही लोक खास फोटोशुट करण्यासाठी विविध अशा पर्यटनाच्या ठिकाणी फोटोसेशन करत असल्याचे पाहायला मिळत असतात. त्या ठिकाणी पोहचवून विविध पोझमध्ये फोटो काढणे हा तर झक्कास फंडा बनला आहे. अशा या फंडयामध्ये कलाकार तरी कसे मागे पडतील. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने खास लोकेशनवर जाऊन फोटोसेशन केले असल्याचे पाहायला मिळत आहे. तिने नुकतेच तिच्या हटके अदामधील दिलखेचक फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. तिचा हा फोटो एकदमच झक्कास दिसत आहे. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट असा तिचा फोटो सोशलमिडीयावर सगळयांचे लक्ष वेधत आहे. तिच्या फोटोसेशनसाठी तिने फोटोग्राफर तेजस नेरूरकरचे आभारदेखील मानले आहे. अशा या तिच्या सुंदर या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. सोनालीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. हिंदी आणि मराठी अशा अनेक चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. त्याचबरोबर तिने रंगभूमीवरदेखील आपल्या अभिनयाची जादू निर्माण केली आहे. तिने मराठीमध्ये अगं बाई अरेच्चा २, डॉ. प्रकाश बाबा आमटे, पुणे ५२, देऊळ, रिंगा रिंगा, गंध, गाभाºयाचा पाऊस, देवराई असे अनेक चित्रपट केले आहेत. तर बॉलिवुडमधील तिचा दिल चाहता है हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटातील तिची भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 




 

Web Title: Sonali Kulkarni's favorite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.