सोनाली कुलकर्णीने केला ट्रेनने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 12:53 IST2017-07-22T05:39:46+5:302017-07-22T12:53:38+5:30

आपले आवडते कलाकार कधी ट्रेन, बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. या ...

Sonali Kulkarni travels by train | सोनाली कुलकर्णीने केला ट्रेनने प्रवास

सोनाली कुलकर्णीने केला ट्रेनने प्रवास

ले आवडते कलाकार कधी ट्रेन, बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. नुकताच सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत ती चक्क आपल्याला ट्रेनमध्ये आणि स्टेशनवर पाहायला मिळत आहे.
सोनाली कुलकर्णीने आज केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले स्थान निर्माण केले आहे. मराठीत तिने अगं बाई अरेच्चा 2, डॉ. प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटासाठी तर तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे आज पाहिले जाते. मिशन काश्मीर, दिल चाहाता है या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिका तर प्रचंड गाजल्या होत्या. ती आरंभ या हिंदी मालिकेतही लवकरच झळकणार असल्याची देखील चर्चा आहे.
सोनालीने नुकताच मुंबई लोकलचा आनंद घेतला आणि या तिच्या प्रवासाचे फोटो ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटला पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये ती आपल्याला ट्रेनमध्ये आणि एलफिस्टन स्टेननला पाहायला मिळत आहे. या पोस्टसोबत तिने लिहिले आहे की, मी राजकमल स्टुडिओत शूट करत होते. मी तिथून जाताना गाडीने न जाता ट्रेन पकडली आणि मुंबईच्या पावसापासून स्वतःचा बचाव केला. या फोटोत सोनालीचे एकदम साधे रूप आपल्याला पाहायला मिळत आहे.
सोनाली अनेकवेळा मुंबई-पुणे हा प्रवास देखील ट्रेनने करते. त्यामुळे कधी तुम्हाला सोनाली कोणत्या स्टेशनवर दिसली तर ही सोनाली सारखी दिसणारी कोणीतरी मुलगी आहे असे समजू नका.  

Also Read : सोनाली कुलकर्णी दिसणार आरंभ या मालिकेत

Web Title: Sonali Kulkarni travels by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.