सोनाली कुलकर्णी भोरमध्ये करतेय या चित्रपटाचं शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 20:30 IST2019-09-18T20:29:24+5:302019-09-18T20:30:22+5:30
निर्माते सवी गोयल यांनी आपल्या होम प्रोडक्शन सवीना क्रिएशनच्या मार्फत तिसरा सिनेमा 'पेंशन' चे चित्रीकरण पुणे स्थित भोर येथे सुरु केले आहे.

सोनाली कुलकर्णी भोरमध्ये करतेय या चित्रपटाचं शूटिंग
निर्माते सवी गोयल यांनी आपल्या होम प्रोडक्शन सवीना क्रिएशनच्या मार्फत तिसरा सिनेमा 'पेंशन' चे चित्रीकरण पुणे स्थित भोर येथे सुरु केले आहे.
मराठी सिनेमात सामाजिक आणि सत्यता याचा अती वापर असून त्याची आवड लक्षात घेऊन निर्माते स्वतंत्र गोयल उर्फ सवी गोयल यांनी हा चित्रपट तयार करायचा असे अगोदर पासूनच ठरविले होते. त्यांनी आपल्या होम प्रोडक्शन अंतर्गत हिंदी चित्रपट ‘एशले’ २०१७ मध्ये रिलीज केला होता. त्यांचा दुसरा सिनेमा ‘देसा धिम्मारी’ २०१८ला तेलुगु मध्ये रिलीज झाला होता.
मराठी चित्रपट 'पेंशन' चे कथा-लेखन आणि दिग्दर्शन मराठी सिनेमाचे पुरस्कार विजेते पुंडलिक धूमिल यांनी केले आहे.
या चित्रपटामध्ये त्यांनी एका महिलेची कथा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही महिला कशा प्रकारे फक्त पेंशनवर आपल्या लहान मुलांना कठीण परिस्थितीत वाढवते हे बघायला खूपच मजेदार असेल.
या महिलेच्या भूमिकेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार आहे.
हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होईल. निर्माते सवी गोयल यांनी नमूद केले की आम्ही आपल्या होम प्रोडक्शन सवीना क्रिएशन अंतर्गत दर वर्षी एक चित्रपट तयार करू यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.