झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केलं साडीतले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 19:36 IST2022-01-24T19:33:47+5:302022-01-24T19:36:54+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) लग्नानंतर प्रचंड चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केलं साडीतले फोटो
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) लग्नानंतर प्रचंड चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आपले फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या सपंर्कात ती असते. नुकताच सोनालीने तिचे साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे असं कॅप्शन तिने याफोटोसोबत दिले आहे. यावर सोनालीच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनालीकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.
लग्नानंतर सोनालीनं दमदार कमबॅक केलंय. सोनालीचा ‘झिम्मा’ आणि ‘पांडू’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आले. सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. 'छत्रपती ताराराणी' आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत..