गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य, अदा पाहून चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 17:20 IST2021-01-09T17:20:00+5:302021-01-09T17:20:01+5:30
अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य, अदा पाहून चाहते झाले घायाळ
अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोनाली कुलकर्णी ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुललार्ज’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक होती. सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. सोनाली सध्या कर्नाटकमध्ये असल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांना दिली.
सोनालीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट शेअर केले आहे. कर्नाटकमध्ये पाऊस पडल्याचे सोनालीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसते आहे. चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.
बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केले होते.तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. लवकरच ती थ्री चिअर्स टू'सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.