सोनाली कुलकर्णीने केले मतदान करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 14:21 IST2017-02-20T08:46:10+5:302017-02-20T14:21:49+5:30
सध्या सगळीकडे राजकीय वातावरणाचे रंग असल्याचे पाहायला मिळत आहे. या राजकीय वातावरणात टीव्ही, चित्रपट, सोशलमीडिया, पोस्टर, जाहिरात अशा विविध ...
सोनाली कुलकर्णीने केले मतदान करण्याचे आवाहन
स ्या सगळीकडे राजकीय वातावरणाचे रंग असल्याचे पाहायला मिळत आहे. या राजकीय वातावरणात टीव्ही, चित्रपट, सोशलमीडिया, पोस्टर, जाहिरात अशा विविध माध्यमातून नागरिकांना मतदान करा असे सांगण्याचा प्रयत्न सर्वतोपरी होताना दिसत आहे. यामध्ये कलाकारदेखील मोठया उत्साहाने सहभागी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील नुकताच सोशलमीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ती आपल्या या व्हिडीओच्या माध्यमातून नागिरकांना उदया मतदान करण्याचे आवाहन करत आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचेदेखील तिने यावेळी सांगितले. सोनालीचे हा स्वत:हून समाजकार्यात होणारा सहभाग तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे.
सोनालीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तिने बॉलिवुड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने स्थान निर्माण केले आहे. तिचा दिल चाहता है हा बॉलिवुड चित्रपट सुपरहीट झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून सोनालीच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. त्याचबरोबर या चित्रपटातील तिची भूमिका आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. या चित्रपटानंतर तिने मागे वळूनच पाहिले नाही. या चित्रपटासहित तिने अनेक बॉलिवुड चित्रपट दिले आहेत. तसेच तिने मराठी चित्रपटसृष्टीत डॉ. प्रकाश बाबा आमटे, अगं बाई अरेच्चा २, पुणे ५२, देऊळ, मुक्ता, गंध असे अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचप्रमाणे ती सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू निर्माण करताना दिसत आहे. आता ती लवकरच गुजराती चित्रपटांमध्येदेखील पाहायला मिळणार आहे.

Let's vote tomorrow for a better Mumbai
Web Title: Sonali Kulkarni appealed to vote
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.