सोनाली कुलकर्णीचा बार्बी लूकमधील फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 19:09 IST2020-05-14T19:07:07+5:302020-05-14T19:09:08+5:30
नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते

सोनाली कुलकर्णीचा बार्बी लूकमधील फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
रसिकांची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.
सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. सोनालीने तिचा वनपीसमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बार्बी डॉलसारखी दिसतेय. चाहत्यांनीची भरभरून कमेंटस आणि लाईक्स देत तिच्या या फोटोला तुफान पसंती दिली आहे. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात.
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.
नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.