सोनाली कुलकर्णीने शेअर केला ठसकेबाज मराठी लूकमधील फोटो, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 13:50 IST2020-04-17T13:33:52+5:302020-04-17T13:50:51+5:30
सोनाली कुलकर्णीने शेअर केला ठसकेबाज मराठी लूकमधील फोटो

सोनाली कुलकर्णीने शेअर केला ठसकेबाज मराठी लूकमधील फोटो, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतेच सोनालीने तिचा एक ठसकेबाज मराठी अंदाजातला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यात फोटोत सोनालीच्या डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा दिसतो आहे. सोनालीच्या एक चाहत्यांने तिला भेट म्हणून डिजीटल पेटिंग केलेला फोटो आणि शाईने लिहिले पत्र पाठवले आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. . नेहमी प्रमाणे सोनालीच्या चाहत्यांनी या फोटोंवर आपल्या कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे. सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी रिअल लाइफमध्ये स्टायलिश आहे. तिच्या स्टाइलचा तरुणींवर प्रभाव दिसून येतो.