सोनाली कुलकर्णीला मिळाला जगातला सगळ्यात अमूल्य पुरस्कार, तिची पोस्ट पाहून कराल तिचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:24 IST2021-06-01T16:23:45+5:302021-06-01T16:24:25+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत विवाहबंधनात अडकली आहे.

सोनाली कुलकर्णीला मिळाला जगातला सगळ्यात अमूल्य पुरस्कार, तिची पोस्ट पाहून कराल तिचे कौतुक
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे वृत्त आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर जगातला सगळ्यात अमूल्य पुरस्काराबद्दल सांगितले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, जगातला सगळ्यात अमूल्य पुरस्कार...आपल्या आई- बाबांचा आशिर्वाद. आज जागतिक पालक दिनानिमित्ताने मी फक्त आभार मानू शकते की हे अद्भूत लोक माझे पालक आहेत. आय लव्ह यू. माझे जग, माझे लाइफ, मिस यू.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ही पोस्ट शेअर करत आपल्या पालकांसोबत इतरांनाही जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसादिवशी ७ मे रोजी तिने कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्न केल्याचे सांगितले. यावेळी तिच्या घरातल्यांनी भारतातून तर कुणालच्या घरातल्यांनी लंडनमधून ऑनलाइन उपस्थिती लावली होती. खरेतर त्यांचे लग्न लंडनमध्ये जूनमध्ये होणार होते. मात्र लंडनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली होती. २ दिवसात सगळे ठरवले. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांत, ४ लोकांच्या साक्षीने मंदिरात, वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून लग्नाच्या प्रमाणापत्रावर सही केली, असे सोनालीने तिच्या पोस्टमध्ये सांगितले होते.
आता सोनाली कुलकर्णी दुूबईतच आहे. तिथले वर्कआउट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.