Sonalee kulkarni : 'सगळ्यांना कळू द्या की मी...' टर्कीतून सोनाली कुलकर्णीने शेअर केली पोस्ट, आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:54 IST2023-05-23T18:42:56+5:302023-05-23T18:54:31+5:30
सोनालीने टर्कीच्या टूरचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sonalee kulkarni : 'सगळ्यांना कळू द्या की मी...' टर्कीतून सोनाली कुलकर्णीने शेअर केली पोस्ट, आली चर्चेत
मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) तिचा अभिनय आणि नृत्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत तिचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. तिचा दमदार अभिनय, अप्सरेसारखं सौंदर्य, तिचा फिटनेस आणि बहारदार नृत्य सगळंच खास. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे.
अलिकडेच सोनालीने तिचा वाढदिवस साजरा केला. जन्मदिवसानिमित्त ती पती कुणाल बेनोडेसोबत ती सध्या टर्कीत भटकंतीचा आनंद घेत आहे. दर वर्षी आवर्जून वेळ काढून ती भटकंतीला जात असते. सोनालीने टर्कीच्या टूरचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पण नुकतेच तिनं आणखी काही फोटो शेअर केलेत आणि त्याच्यासोबत एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. त्यामुळं सोनालीच्या या फोटोंची जास्तच चर्चा सुरू आहे.
सोनालीने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, सगळ्यांना हे कळू द्या की, आनंदी आयुष्य जगलेय.! सोनालीच्या या फोटोवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलाय.
सोनाली कुलकर्णी हिचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील लष्करी छावणीमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केलं आहे. वडील मराठी आणि आई पंजाबी असल्यामुळे सोनाली लहानपणापासूनच घरात हिंदीमध्येच बोलायची. त्यामुळे सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिला नीट मराठी बोलता येत नव्हतं. पण सोनालीने सगळ्या कमतरतांवर मात करत, एक आघाडीची अभिनेत्री होईपर्यंतचा पल्ला गाठला.