कधी बोल्ड तर कधी देसी असा आहे मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा Swag...!, परदेशातून शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 08:00 IST2019-06-02T08:00:00+5:302019-06-02T08:00:00+5:30

प्राजक्ता माळी सध्या व्हॅकेशन मुडमध्ये आहे. तिने आपल्या युरोप टूरचे फोटो फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर नुकतेच शेअर केले आहेत.

Sometimes the bold and the ever-desi is Marathmoli Prajakta Mali's Swag ...!, Shared from abroad | कधी बोल्ड तर कधी देसी असा आहे मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा Swag...!, परदेशातून शेअर केला फोटो

कधी बोल्ड तर कधी देसी असा आहे मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा Swag...!, परदेशातून शेअर केला फोटो

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

 प्राजक्ता माळी सध्या व्हॅकेशन मुडमध्ये आहे. तिने आपल्या युरोप टूरचे फोटो फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर नुकतेच शेअर केले आहेत. आपल्या बिझी शेड्यूलमधून स्वत: साठी वेळ काढून प्राजक्ता युरोप एन्जॉय करताना दिसतेय. तिथून तिने नुकताच मराठमोळा लूक शेअर केला आहे. ज्यात ती खुपच गोड दिसते आहे. प्राजक्ताने हा मराठमोळा लूक शेअर करीत म्हटले की, देसी स्वॅग. तेरा दिवस बाकी... आणि मी भारताला खूप मिस करत आहे. तसेच भारतातील पदार्थ, भाषा व मराठमोळ्या वेशाला मिस करत आहे. पुण्यात फोटोशूट केलेला जुना फोटो शेअर केला आहे.

सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी  आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. 


प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे.

यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. 

Web Title: Sometimes the bold and the ever-desi is Marathmoli Prajakta Mali's Swag ...!, Shared from abroad