सामाजिक जाणिवेतून 'घुमा' या चित्रपटामध्ये शिक्षणपद्धतीवर प्रकाशझोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 11:26 IST2017-01-15T11:26:27+5:302017-01-15T11:26:27+5:30

 सध्या प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याच्या प्रेमात पडलेले दिसत आहे. आर्थिक परिस्थिती असो या नसो आपला मुलं ...

From social perspective, the film 'Ghuma' shines on education system | सामाजिक जाणिवेतून 'घुमा' या चित्रपटामध्ये शिक्षणपद्धतीवर प्रकाशझोत

सामाजिक जाणिवेतून 'घुमा' या चित्रपटामध्ये शिक्षणपद्धतीवर प्रकाशझोत

 
ध्या प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याच्या प्रेमात पडलेले दिसत आहे. आर्थिक परिस्थिती असो या नसो आपला मुलं ही इंग्रजी शाळेतच शिकली पाहिजे अशी हल्लीच्या पालकांची जिद्द असते. यामध्ये पालक  स्वत:ची ओढाताण करून आपल्या पाल्याचे होणारे हे शिक्षण सामाजिक समस्या होऊ पाहत आहे. याचा अनुभव घेऊनच सामाजिक जाणिवेतून शिक्षण व्यवस्थेवरचे भाष्य करणाºया 'घुमा' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असे या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 
         
     पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक मराठी चित्रपटांमध्ये 'घुमा' प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित चित्रपटाचे दिग्दर्शक महेश काळे, सहायक दिग्दर्शक अविनाश मकासरे आणि चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे शरद जाधव यांच्याशी समर नखाते यांनी संवाद साधला. 
             
        दिग्दर्शक महेश काळे पुढे म्हणाले, एक सामाजिक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. थोड्या जरी पालकांनी त्याचा विचार केला तर ते मी या चित्रपटाचे यश मानेन. शिक्षणाबरोबरच अनुभवही तेवढाच महत्वाचा आहे हेही सांगण्याचं या चित्रपटात प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी भाषिक म्हणून चित्रपट निर्माण करताना कसल्याही अडचणी आल्या नाहीत असे सांगताना ते म्हणाले, आमच्या चित्रपटाचे बजेट कमी असले तरी चित्रपट निर्माण करतानाच त्यामध्ये व्यावसायिक कलाकारांना घ्यायचे नाही असे निश्चित केले होते त्यामुळे मुख्य भूमिकेसाठी शरद जाधव या नवख्या चेहºयाची निवड केली. 

Web Title: From social perspective, the film 'Ghuma' shines on education system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.