प्रार्थना बेहेरे करणार सामाजिक चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 13:29 IST2017-02-24T07:59:14+5:302017-02-24T13:29:14+5:30
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही प्रेक्षकांना नेहमीच प्रेमकथा, कौटुंबिक आणि कॉमेडी चित्रपटात पाहायला मिळाली. आता मात्र ही अभिनेत्री तिच्या या ...
.jpg)
प्रार्थना बेहेरे करणार सामाजिक चित्रपट
भिनेत्री प्रार्थना बेहेरे ही प्रेक्षकांना नेहमीच प्रेमकथा, कौटुंबिक आणि कॉमेडी चित्रपटात पाहायला मिळाली. आता मात्र ही अभिनेत्री तिच्या या अभिनयाची चौकट मोडत एका वेगळया आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ती आता लवकरच एका सामाजिक चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती एका सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या हटके भूमिकेविषयी प्रार्थना बेहेरे लोकमत सीएनएक्सला सांगते, आतापर्यत मी अनेक प्रेमकथा केल्या आहेत. त्याचबरोबर या सर्व चित्रपटांमध्ये मी ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळाले. आता मात्र एका सर्व सामान्य अशा सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा असे काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाली म्हणून खूपच आनंद झाला.
कादिर शेख दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदी नाटक केले आहे. आमचा हा चित्रपट शेतकºयांच्या समस्यांवर आधारित आहे. अशा या चित्रपटातून समाजापर्यत एक चांगला संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे. देशाचे भविष्य म्हणून तरूणांकडे पाहिले जाते. अशा या तरूणाईला समोर ठेवूनच हा चित्रपट दिग्दर्शित करण्यात आला आहे. अशा या सामाजिक चित्रपटाचा भाग मला होता आले यासारखी महत्वाची गोष्ट नाही. तसेच या चित्रपटात मला वेगळया भूमिकेत पाहून, माझे चाहतेदेखील नक्कीच खूश होतील असे वाटते. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरू आहे. तसेच काही चित्रिकरण नुकतेच जत येथे पूर्ण करण्यात आले आहे. या चित्रपटात माझ्यासोबत अभिनेता भूषण प्रधान झळकणार आहे. आमच्या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे आमची ही हटके जोडी नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. प्रार्थना बेहेरेच्या या आगामी चित्रपटाचे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे.