म्हणून ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ‘मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमिअर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 12:34 IST2017-07-01T07:02:13+5:302017-07-01T12:34:55+5:30

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये होणा-या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. १० ते २२ ऑगस्ट ...

So premiered at 'Melbourne Film Festival' for 'Hardyantar'! | म्हणून ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ‘मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमिअर!

म्हणून ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ‘मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमिअर!

क्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये होणा-या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. १० ते २२ ऑगस्ट २०१७ दरम्यान मेलबर्नमध्ये आयोजित होणा-या ह्या फिल्म फेस्टिव्हलव्दारे हृदयांतरचा वल्ड प्रीमिअर होणार आहे.बहूप्रतिक्षित चित्रपट हृदयांतरव्दारे विक्रम फडणीस दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. ह्या कौटुंबिक भावनिक चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसतील.हृदयाला भिडणा-या ह्या सिनेमाचा ट्रेलर बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशनच्या हस्ते झाला. तर सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्याला सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन उपस्थित होती.मेलबर्नला होणा-या ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विक्रम फडणीस आपला चित्रपट प्रस्तूत करतील. तसेच आपला फॅशन डिझाइनर ते फिल्ममेकर हा प्रवास ‘कॅटवॉक टू सिनेमा’ ह्या मास्टरक्लासव्दारे चित्रपटरसिकांसमोर मांडतील.या सन्मानाने आनंदित झालेले विक्रम फडणीस प्रतिक्रिया देताना म्हणाले, “हृदयांतर चित्रपटाला अशा पध्दतीने एक जागतिक व्यासपिठ मिळणे हा आमचा सन्मानच आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिनेरसिकांसमोर आणि मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझ्या सिनेमाचे सादरीकरण करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्यासारखा एखादा नवोदित फिल्ममेकर ह्यापेक्षा अधिक काय मागू शकेल.”  या भारतीय फिल्म महोत्सवात ‘हृदयांतर’ शिवाय अ बिलीयन कलर स्टोरी (इंग्रजी), आसामपता (बंगाली), चोर- द सायकल (आसामी) क्रॉनिकल्स ऑफ हरी (कन्नडा) अ डेथ इन दि गंज (इंग्रजी). डॉ. रखमाबाई (मराठी), पूर्णा- करेज हॅज नो लिमीट्स (हिंदीं) आणि बाहूबली- बाहूबली २ हे चित्रपट दाखवले जातील.टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली, यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ आहे. या चित्रपटात  मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, अमित खेडेकर आणि मीना नाईक  मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: So premiered at 'Melbourne Film Festival' for 'Hardyantar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.