'इंटिमेट सीन करतांना लाज वाटत नाही, कारण...'; बोल्ड सीनविषयी स्मिता तांबेचं बेधडक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:39 PM2024-04-09T12:39:57+5:302024-04-09T12:40:36+5:30

Smita tambe: स्मिताने बऱ्याच सिनेमात बोल्ड सीन दिले असून हे सीन करताना सेटवरचं वातावरण आणि तिची मनस्थिती कशी असते हे सांगितलं.

smita-tambe-commented-about-the-intimate-and-bold-scenes-in-the-film | 'इंटिमेट सीन करतांना लाज वाटत नाही, कारण...'; बोल्ड सीनविषयी स्मिता तांबेचं बेधडक विधान

'इंटिमेट सीन करतांना लाज वाटत नाही, कारण...'; बोल्ड सीनविषयी स्मिता तांबेचं बेधडक विधान

मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे (smita tambe). आजवरच्या कारकिर्दीत स्मिताने अनेक गाजलेल्या हिंदी, मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच अनेक मालिकांमध्येही ती झळकली आहे. स्मिता तिच्या अभिनयसोबतच बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते. यात अलिकडेच तिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने सिनेमातील बोल्ड इंटिमेट सीन आणि किसिंग सीन यावर उघडपणे भाष्य केलं आहे.

स्मिताने नुकतीच 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने किसिंग सीन देण्यापूर्वी तिची मानसिक तयारी कशी असते हे सांगितलं. इतकंच नाही तर किसिंग सीन करण्यापूर्वी मी कधीच अवघडत नाही किंवा मला या सीनचा काहीही प्रॉब्लेम नसतो असंही तिने यावेळी सांगितलं.

"आयुष्यात कधीही किसिंग सीन करताना मी अस्वस्थ होणार नाही हे मला माहितीये. कँडल मार्च सिनेमात मी निलेश दिवेकरसोबत इंटीमेट सीन दिला होता. तेव्हा सेटवर सगळेच अवघडले होते पण मला अजिबात विचित्र वाटलं नाही. तेव्हा मी निलेशलासुद्धा हे सांगितलं होतं. असे सीन करतानां मला लाज वाटत नाही कारण, त्या पात्राचा सरावाचाच तो एक भाग आहे", असं स्मिता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्या प्रमाणे त्या पात्राची भांडं उचलण्याची विशिष्ट पद्धत असते. पाणी पिण्याची पद्धत असते, उठण्याची, बसण्याची लकब असते. त्याचप्रमाणे हे दृश्यसुद्धा अगदी सहज आहे. त्या चित्रपटाच्या कथेनुसार जर इंटीमेट सीन असतील तर मग ते कधीच विचित्र किंवा वल्गर वाटणार नाही."

दरम्यान, स्मिता लवकरच कासरा या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमापूर्वी तिने . ‘७२ मैल एक प्रवास’ यासह ‘जोगवा’, ‘देऊळ’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नूर’, ‘पंगा’, ‘जवान’, ‘जोरम’ यांसारख्या हिंदी, मराठी सिनेमात काम केलं आहे. तसंच ती मालिका आणि वेबसीरिजमध्येही झळकली आहे.

Web Title: smita-tambe-commented-about-the-intimate-and-bold-scenes-in-the-film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.