हा पुरस्कार मिळवणारी स्मिता गोंदकर ठरली पहिली मराठी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 11:58 IST2017-03-16T12:10:57+5:302017-03-17T11:58:58+5:30
अभिनेत्री स्मिता गोंदकरला पहिला अल्टरनेटीव्ह फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग 2017 तर्फे मि.अँड मिसेस अनवॉन्टेड सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहिर झाला ...

हा पुरस्कार मिळवणारी स्मिता गोंदकर ठरली पहिली मराठी अभिनेत्री
अ िनेत्री स्मिता गोंदकरला पहिला अल्टरनेटीव्ह फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग 2017 तर्फे मि.अँड मिसेस अनवॉन्टेड सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहिर झाला आहे.विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारी स्मिता गोंदकर पहिली मराठी अभिनेत्री ठरणार आहे.नुकतेच या पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली असून टोरंटो येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.याविषयी स्मिता गोंदकरने सांगितले की, मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे कळताच माझा आनंद नक्कीच मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी खूप खुश आहे.आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.मात्र हा पुरस्कार खूप स्पेशल असणार आहे.या पुरस्काराचे श्रेय पूर्णपणे या सिनेमाच्या पडद्यामागे काम करणा-यांना जातो.ज्यांनी ज्यांनी या सिनेमासाठी माझ्या भूमिकेवर खूप मेहनत केली त्यांच्या सगळ्यांचा हा गौरव होत असल्याचे मी समजते. सिनेमाचे दिग्दर्शक दिनेश अनंत आणि माझा सहकलाकार राजेंद्र शिरसाटकर, निर्माते मितांग यांचे जितके आभार मानावे तितके कमी आहे. या पुरस्काराचे श्रेय सगळे या मंडळींनाच जाते.पुरस्कार प्रत्येक कलाकाराला त्याच्या आयुष्यात नवीन गोष्टी करण्यासाठी स्फुर्ती देऊन जातात.तर प्रत्येक भूमिका ही एक माणूस म्हणून प्रेरणा देणारी ठरते असे स्मिताने सांगितले.या सिनेमाचे प्रदर्शनापूर्वीच वेगवगळ्या पुरस्कार सोहळ्यात विशेष कौतुक करण्यात आले असून अनेक पुरस्कारही मिळवले आहेत.आगामी काळातही स्मिता खास भूमिकेत झळणार अाहे.'लव्ह बेटींग' आणि 'भय' या सिनेमात स्मिता रसिकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे सध्या स्मिता सिनेमाच्या शूटिंगसह सिनेमाचे प्रमोशन करण्यात बिझी आहे त्यामुळे सध्या स्मिताची तारेवरची कसरत सुरू आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.