प्रविणचे टारगेट ९० दिवसात सिक्स पॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:02 IST2016-05-24T09:32:36+5:302016-05-24T15:02:36+5:30
लिखाण, अभिनय, दिग्दर्शन या सर्व भूमिकेतून आपले यशस्वी योगदान देणारा प्रविण तरडे आता, सिक्स पॅकच्या तयारीला लागला आहे. पुरूषार्थ ...

प्रविणचे टारगेट ९० दिवसात सिक्स पॅक
ल खाण, अभिनय, दिग्दर्शन या सर्व भूमिकेतून आपले यशस्वी योगदान देणारा प्रविण तरडे आता, सिक्स पॅकच्या तयारीला लागला आहे. पुरूषार्थ व शिवाजी महाराज या आगामी चित्रपटासाठी ही सीक्स पॅकची तयारी चालू असल्याचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. प्रविण म्हणाला, या सीक्स पॅकसाठी रोज सकाळी वेताळ टोकडीवर ५ किमी चालतो. तसेच खूप खवय्या असून देखील संध्याकाळी सात नंतर काहीही खात नाही. आणि निरव्यसनी असल्यामुळे त्याचा फायदा बॉडी बनविण्यासाठी देखील होत आहे. तसेच कॉलेजमध्ये असताना बॉडी बिल्डींगच्या स्पर्धेत उतरल्यामुळे सीक्स बवनिणे जास्त अवघड जाणार नाही. पण हे सीक्स पॅक बनविण्यासाठी ९० दिवसांचे टारगेट समोर ठेवले आहे. आणि हे टारगेट मी पूर्ण करणारच असा विश्वास देखील आहे. हे सीक्स पॅक बनविण्यासाठी ट्रेनर नितीन ढवळे व निलेश सातपुते यांचे मार्गदर्शनदेखील चालू आहे.