'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात 'नटसम्राट'ला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 19:04 IST2016-05-11T13:34:23+5:302016-05-11T19:04:23+5:30

 नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. ‘सैराट’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसांमध्ये तब्बल 41 कोटी ...

'Sirat' earns record break, in 11 days, 'Natsamastra' will be spoiled | 'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात 'नटसम्राट'ला धोबीपछाड

'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात 'नटसम्राट'ला धोबीपछाड

tyle="color: rgb(5, 0, 2); font-family: 'Roboto Condensed', sans-serif; font-size: 17px; line-height: 24.2857px;"> नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. ‘सैराट’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसांमध्ये तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सैराटने नटसम्राट चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश : डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या आठवड्यात 25 कोटींचा टप्पा पार केला होता.

महत्त्वाचं म्हणजे पहिल्या विकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला होता.

‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली.

यापूर्वी ‘नटसम्राट’ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या 10 दिवसांतच पार केला.

सरीकडे ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता. तर रवी जाधव यांच्या टाईपमास- 2 ने पहिल्या 3 दिवसांमध्ये तब्बल 11 कोटी रुपयांची कमाई केली होती.

मराठी सिनेमांची कमाई

यापूर्वी ‘दुनियादारी’ या सिनेमाने 26 कोटी कमावून, मराठी सिनेमाच्या कमाईचा ट्रेण्ड तयार केला होता. मग ‘टाईमपास’ या सिनेमाने त्यापुढे मजल मारून 32 कोटींची कमाई केली. याशिवाय ‘टाईमपास 2’नेही 28 कोटी कमावले होते. मात्र ‘लय भारी’ सिनेमाने तब्बल 38 कोटींचा गल्ला जमवून, मराठी सिनेसृष्टीत कमाईचा विक्रम प्रस्थापित केला होता.

 

मराठी सिनेमांची भरारी

*दुनियादारी : 26 कोटी

*टाईमपास – 32 कोटी

*टाईमपास 2 – 28 कोटी

*लय भारी – 38 कोटी

* नटसम्राट – 40 कोटी

*कट्यार काळजात घुसली – 31 कोटी

Web Title: 'Sirat' earns record break, in 11 days, 'Natsamastra' will be spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.